सानेगुरुजी नगरात सुविधांचा बोजवारा.. विविध समस्यांनी रहिवासी त्रस्त.. मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
चोपडा दि.२(प्रतिनिधी) शहरातील साने गुरुजी नगर परिसरात सार्वजनिक सुविधांचा अभाव असून रस्ता,गटार व स्वच्छता आदी समस्यांनी तोंड वर काढले आहे. नागरिकांना वर्षानु वर्षे विविध हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असल्याने रहिश्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.तात्काळ या भागातील समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी मुख्याधिकारी हेमंत निकम व नगराध्यक्षा मनिषाताई जीवनभाऊ चौधरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे .
खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे सांगणे ही मुश्किल असल्याचे चित्र असून सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्याने पाणी दिशाहीन झाले आहे.त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तरी प्रशासनाने ताबडतोब लक्ष घालून समस्या सोडवाव्यात असेही नागरिकांनी म्हटले आहे.
आज दि.२जून रोजी साने गुरुजी नगर रहिवास्यान्च्या वतीने कॉलनीतील प्रलंबित कामाचा पाठपुरावा करण्यासाठी श्री.समाधान सोनवणे व कु. शुभम सोनवणे यांनी नगरपरिषदेचे गटनेते श्री.जीवनभाऊ चौधरी यांची भेट घेतली. तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.हेमंत निकम यांना निवेदनाचा पाठपुरावा करण्याकरिता नम्र निवेदन केले. सदर कामे जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्तावित असून महिना भराच्या काळात मार्गी लावण्यात येतील असेआश्वासन मुख्याधिकारी यांच्या कडून देण्यात आले.