तहसिलदार करणार त्या संघटनांची चौकशी .. आदिवासी कोळी समाजाला आश्वासन*

 

तहसिलदार करणार त्या संघटनांची चौकशी .. आदिवासी कोळी समाजाला आश्वासन


चोपडा दि.१(प्रतिनिधी):- आज दि.1 जुन 2023 रोजी मोठ्या संख्येने आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या वतीने जमात बांधवानी आदिवासी विरोधी संघटना जय रावण प्रतिष्ठान व आदिवासी युवा शक्ती संघटना यांनी टोकरे कोळी जमात विरोधी निवेदन दिल्यामुळे मा.पोलीस निरीक्षक यांचेकडे तक्रार नोंदविली व मा.तहसीलदार यांच्याकडे सदर बेकायदेशीर वर्तणूक करणाऱ्या संघटना रद्दबातल करण्याचे निवेदन केले. सदर निवेदन अधिकाऱ्यांनी स्वीकारून विषयाची पूर्ण चौकशी केली जाईल व त्या अनुसार योग्य ती कार्यवाही पार पाडली जाईल. असे कळविले. 

सदर निवेदन देता प्रसंगी जमातीचे विधीतज्ञ ऍड. गणेश सोनवणे, आदिवासी कोळी जमातीचे युवा संघटक शुभम सोनवणे, माजी सैनिक श्री.नामदेव येळवे, श्री.जगन्नाथ बाविस्कर, श्री. गोपाल् बाविस्कर, श्री.समाधान सोनवणे, श्री.कैलास सोनवणे, श्री.भाईदास बाविस्कर, श्री.बाळू कोळी, श्री.नरेंद्र कोळी, श्री.गोकुळ बिऱ्हाडे, श्री. सतीश कोळी, श्री.गजानन कांडेले, श्री. ईश्वर बाविस्कर, श्री.दिनेश सपकाळे, श्री. विजय बाविस्कर, श्री.किशोर बाविस्कर, श्री.दत्तू कोळी, श्री.मोतीलाल रायसिंग, श्री.गव्हरलाल बाविस्कर, श्री.सागर सपकाळे, श्री.चेतन कोळी, श्री.भरत पाटील, सौ.मनीषाताई येळवे, श्री.छगन देवराज, श्री. राजेंद्र शिरसाठ, श्री.भास्कर रायसिंग, श्री.दिलीप कोळी, श्री.शशिकांत बाविस्कर, श्री. प्रल्हाद ठाकरे, श्री. रवींद्र बाविस्कर तसेच खेड्यापाड्यातील जमात बांधव उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने