चोपडा आगार प्रमुखांचा ३ जुन रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

 चोपडा आगार प्रमुखांचा ३ जुन रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार


चोपडा दि.१(प्रतिनिधी):  आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे  महामंडळाच्या ७५ व्या  अमृत  महोत्सवी वर्षानिमित्त सन २०२२ - २०२३ मधील फलनिष्पत्ती मूल्यांकनात  महाराष्ट्र राज्यातील २५० आगारापैकी ९ अतिउत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगार व्यवस्थापक यांचा मुंबई येथे सत्कार करण्यात येणार असून यामध्ये चोपडा आगाराचे आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते मुंबई येथे दि. ०३ जून २०२३ रोजी यथोचित असा सत्कार आणि गौरव करण्यात येणार आहे, यानिमित्ताने महेंद्र पाटील व आगारातील सर्व सहकारी कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले.

चोपडा आगाराने केलेल्या उलेखनीय कामगीरीचे विभागीय स्तरावर सर्वत्र कोतुक होत आहे. भविष्यात देखील अशीच उल्लेखनीय व उत्कूष्ट कामगीरीचे सातत्य टिकवुन चोपडा आगार महाराष्ट्रात अव्वल क्रमांक आणण्यावर भर असेल अशी ग्वाही आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी दिली.तर आगाराला मिळालेला पुरस्कार हा आगारातील सर्व कर्मचार्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ असुन हा पुरस्कार कर्मचार्यांना समर्पित करतो असे या वेळी पाटील यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने