उद्या १० वी बोर्ड परिक्षा निकाल..

 

उद्या १० वी बोर्ड परिक्षा निकाल..


पुणे दि.१ जून: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेच्या निकालाबाबत एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या म्हणजेच 2 जून ला दुपारी 1 वाजेल लागणार आहे.
दरम्यान, परीक्षेनंतर दहावीचा निकाल कधी लागणार? याची प्रतिक्षा पालकांसह विद्यार्थ्यांना होती. आता ही प्रतिक्षा संपली असून उद्या म्हणजेच शुक्रवारी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे राज्यभरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकाचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च - एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने