शेतकरीच आपल्या पिकांचे डॉक्टर, कृषी विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम
गणपूर(ता चोपडा)ता 29: कृषि संजीवनी सप्ताह मोहिमेंतर्गत हातेड (ता.चोपडा) येथे शेतकरीच आपल्या पिकाचे डॉक्टर ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून कापूस पिकावर विशेष शेतीशाळा वर्ग घेण्यात आला.
या चर्चासत्रावेळी शेतकरी बांधवाना माती व पाणी परीक्षण मोफत करून देण्यात आले.प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर मिनी लॅब व डिजिटल पी एच मीटर च्या साहाय्याने माती व पाणी परिक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
कृषी दिन व डॉक्टर डे च्या पूर्वसंध्येला
सहभागी शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष डॉक्टर प्रमाणे अँप्रोन (apron) व स्टेथोस्कोप (stethoscope) परिधान करून शेतीशाळेत निरीक्षणे घेऊन पीक परिस्थितीची चिकित्सा यावेळी केली.परिसरातील आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा उपविभागीय कृषी अधिकारी जाधवर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला उप विभागीय कृषी अधिकार दादाराव जाधवर , तालुका कृषी अधिकारी दिपक साळुंखे , नरेंद्र जाधव दिनेश पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी हातेड खुर्द, हातेड बुद्रुक,गलवाडे येथील शेतकरी उपस्थित होते.सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक जितेंद्र सनेर यांनी तर कृषी सहाय्यक विलास मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक विलास मोरे, डी एन पाटील, महेश सनेर, राहुल साळुंखे यांनी परिश्रम घेतले............
हातेड......कार्यक्रमाला उपस्थित अधिकारी व मार्गदर्शक