तुळस पत्रावर साकारले विठ्ठलाचे चित्र.. विवेकानंद शाळेच्या कला शिक्षकाची जादुई करिष्मा

 *तुळस पत्रावर साकारले विठ्ठलाचे चित्र.. विवेकानंद शाळेच्या कला शिक्षकाची जादुई करिष्मा 



तुळस हे एक औषधी रोपटे आहे. दिसायला साधारण असलेली तुळस सर्वगुणसंपन्न असते.आजीच्या बटव्यातील काढ्यात तुळशीला अनन्यसाधारण महत्व होते. *आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या वारीला जाताना प्रत्येक वारकरी स्त्रीच्या डोक्यावर तुळशी वृंदावन दिसतेच,* म्हणून तिला देवत्व बहाल केले. तुळस बहुगुणी आहे. ती भोवतालची हवा शुद्ध करते.खोकला, सर्दी, ताप या आजारावर तुळस गुणकारी आहे. त्वचा रोग, दंत रोग यावरील रामबाण उपाय आहे. एखाद्या शुभप्रसंगी सर्वत्र तुळशीपत्राने जल शिंपडून पावित्र्य निर्माण केले जाते. चोपडा येथील विवेकानंद विद्यालयाचे तंत्रस्नेही कलाशिक्षक यांनी येत्या आषाढी एकादशीनिमित्त चक्क छोट्याशा तुळशी पत्रावर ऍक्रेलिक कलरच्या सहाय्याने 30 मिनिटात अवघ्या वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत मायबाप विठ्ठलाचे चित्र व पांडुरंग हे अक्षरचित्र साकारले त्यांच्या या नावीन्यपूर्ण कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने