आता चोपड्यात होणार राज्य उत्पादन शुल्क कार्यालय व कर्मचारी निवास बिल्डिंग.. [आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकात सोनवणे यांच्या प्रयत्नांची जादू.. ४ कोटी ५९लाखांचा निधी मंजूर

 

आता चोपड्यात होणार राज्य उत्पादन शुल्क कार्यालय व कर्मचारी निवास बिल्डिंग.. [आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकात सोनवणे यांच्या प्रयत्नांची जादू.. ४ कोटी ५९लाखांचा  निधी मंजूर ]


चोपडा दि.,२१(प्रतिनिधी):आ. सौ लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्यामुळे चोपडा येथे राज्य उत्पादन शुल्क कार्यालय प्रशासकीय इमारत व कर्मचारी निवासस्थान बांधकाम यासाठी ४,५८,९०,०००/-चार कोटी अठ्ठआवन्न लक्ष   रुपये निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
उत्पादन शुल्क मंत्री मा.शंभूराज देसाई यांनी प्रशासकीय मान्यतेची प्रत आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी.आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांना दिली. यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भूसे हे ही उपस्थित होते.याप्रसंगी आमदार लताताई सोनवणे व माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी मंत्रीमहोदयांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले








Post a Comment

थोडे नवीन जरा जुने