चोपडा येथे आदिवासी क्षयरुग्णांना अन्न-धान्याच्या किटचे मोफत वाटप

 चोपडा येथे आदिवासी क्षयरुग्णांना अन्न-धान्याच्या किटचे मोफत वाटप 

चोपडा,दि.२१(प्रतिनिधी)-केंद्रीय आरोग्य मंत्रालय दिल्ली, यांच्या निर्देशानुसार देशातील क्षयरुग्नांसाठी निक्षय पोषण योजना अंतर्गत रुग्णांना दरमहा शासकीय अनुदान दिले जाते,  त्याचप्रमाणे पंतप्रधान म.नरेंद्र मोदी यांनी सन- २०२५ पर्यंत भारत हा क्षयरोग मुक्त होणेबाबत आवाहन केले आहे. त्याच अनुषंगाने आदिवासी बहुल तालुका चोपडा येथे इंडियन रेड क्रॉस सोसायटी जळगाव तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय,चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील आदिवासी क्षयरुग्णांना अन्न धान्य असलेल्या किटचे मोफत वाटप करण्यात आले. 

क्षयरुग्ण हा, क्षयरोगा विरूध्द औषधोपचार घेत असतांना, त्यासोबतच आहार देखील तेवढाच महत्वाची भूमिका बजावत असतो. आहार जर पोषक असला तर क्षयरूग्न हा औषधोपचार सहज रित्या पचवू शकतो. 

आज प्रथम टप्प्यात तालुक्यातील २५ क्षयरूग्नांना मोफत अन्न धान्य किट श्री.लक्ष्मण तिवारी प्रशासकीय अधिकारी इंडियन रेड क्रॉस सोसायटी, जळगाव तसेच डॉ.प्रदीप लासूरकर तालुका आरोग्य अधिकारी, चोपडा यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.उपस्थित क्षयरूग्णांना घ्यावयाची काळजी बाबत संपूर्ण माहिती देण्यात आली.

 त्याचप्रमाणे क्षयरुग्णांसाठी अनमोल ठरणारी सदर मोहीम, जिल्हा क्षयरोग अधिकारी-डॉ.शांताराम ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदीप लासूरकर तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष-गनी मेमन, चेअरमन-विनोद बियाणी, अतिरिक्त प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेश सुरळकर, कार्यालयीन सहाय्यक-योगेश सपकाळे व हायजेनीक किट देणगीदार यांच्या महत्वपूर्ण मार्गदर्शनानुसार पार पडली. 

प्रसंगी.. जिल्ह्यास्तरावरून जिल्हा एमडीआर समन्वयक-दीपक संदानशिव, डॉट्स प्लस पर्यवेक्षक-विलास पाटील, पीपीएम समन्वयक-किरण निकम, तसेच तालुका हिवताप पर्यवेक्षक-जगदीश बाविस्कर, तालुका आरोग्य सहाय्यक-जितेंद्र मोरे, तालुका क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक-किशोर सैंदाणे, क्षयरोग उपचार पर्यवेक्षक-प्रमोद पाटील, क्षयरोग हेल्थ व्हीजीटर-कमलेश बडगुजर इ.उपस्थित होते. 

शेवटी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-तालुका वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक-किशोर सेंदाणे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने