प्रताप विद्या मंदिराच्या ज्ञानदिंडीने चोपडा वासियांचे वेधले लक्ष

 प्रताप विद्या मंदिराच्या ज्ञानदिंडीने  चोपडा वासियांचे  वेधले लक्ष

चोपडादि.३० (प्रतिनिधी):- चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराने आषाढी एकादशीनिमित्त भव्य -दिव्य अशा ज्ञानदिंडीचे,वृक्षदिंडीचे आयोजन चोपडा शहरात  दिनांक 29 जून 2023 रोजी सकाळी ठीक 7 वाजता केले.यामुळे संपूर्ण चोपडा वाशीयांच्या  डोळ्यांचे पारणे फिटले.अतिशय सुंदर सुबक अशा वाहनातून विठ्ठल - रुक्मिणी व वारकरी संप्रदायातील  संत ज्ञानेश्वर ,संत मुक्ताबाई,संत जनाबाई, संत सोपान, संत तुकाराम, संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावता माळी व इतर संतांचा सजीव देखावा घेत शहराच्या मुख्य रस्त्यांवरून चौकाचौकातून नागरिकांचे लक्ष वेधले. या ज्ञानदिंडीची सुरुवात ग्रंथ व वृक्ष पूजनाने झाली प्रताप विद्या मंदिराच्या गावातील विभागातून प्रथमतः हेडगेवार चौक, राणी लक्ष्मीबाई चौक ,गांधी चौक, गावाच्या मुख्य रस्त्यावरून शिवाजी चौकातून भव्य अशा रॅलीचे सुंदर शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले होते या ज्ञान दिंडीची आकर्षकता संतांच्या वाणीने जयघोष करीत पालखी खांद्यावर घेतलेले वारकरी, ग्रंथशीरी घेतलेल्या मुली, तुळशी वृंदावन व कलशधारी मुली त्यांच्या पाठी वारकरी वेशातील मुले ,एन.सी.सी आर.एस.पी.स्काऊट गाईडची पथके, शाळेतील विद्यार्थी ,शिक्षक बंधू-भगिनी ,लेखनिक कर्मचारी शिपाई बंधू असा क्रम होता.. विठ्ठलाच्या नामघोषाने सारे शहर दुमदुमले .एवढेच नाही तर वृक्ष संवर्धन , व्यसनांची होळी, जलसंवर्धन, कचरा व्यवस्थापन इ. विषयांना घेऊन चौका चौकात पथनाट्य ही सादर करण्यात आली.चिमुकल्यांच्या तोंडून विठ्ठलाचे नामस्मरण ,समाज प्रबोधन हे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य होते. या ज्ञानदिंडीची समाप्ती प्रताप विद्यामंदिराच्या मुख्य सत्यम शिवम सुंदरम इमारतीच्या आवारात रिंगण करून ध्वजधारी बालकांच्या व टाळ मृदुंग आवाजात फुगडी खेळत करण्यात आली. तसेच आषाढी एकादशी निमित्त दुपार व ज्युनियर कॉलेज च्या वतीने पथनाट्ये सादर करण्यात आली. या ज्ञानदिंडीस संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर, संचालक प्रविणभाई गुजराथी, प्रशालेचे मुख्याध्यापक पी एस गुजराथी, उपमुख्याध्यापक एस जी डोंगरे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य जे एस शेलार, पर्यवेक्षिका माधुरी पाटील, पर्यवेक्षक एस एस पाटील, पी डी पाटील, संस्थेचे समन्वयक गोविंदभाई गुजराथी, डी टी महाजन, शिक्षक बंधू भगिनी, लेखनिक बंधू,कर्मचारी बंधू उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने