विरोधी पक्षनेते अजितदादा पवार येत्या अधिवेशनात मांडणार आदिवासी कोळी जमातीचा प्रश्न..

 

  विरोधी पक्षनेते अजितदादा पवार येत्या अधिवेशनात मांडणार आदिवासी कोळी जमातीचा प्रश्न..

अमळनेर  दि.१६(प्रतिनिधी)  अमळनेर  दौऱ्यावर आलेले विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याशी कोळी समाज शिष्टमंडळाने भेट घेत आदिवासी कोळी समाजावर होत असलेल्या अन्यायाची माहिती देऊन  निवेदन दिले असता कोळी समाजाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन  त्यांनी दिले.शिवाय येत्या अधिवेशनात हा प्रश्न मांडू आणि मुख्यमंत्री  व आदिवासी विकास विभागाचे आयुक्त, सचिव यांचेसमवेत बैठक लावून देऊन चर्चा घडवून आणणार  असल्याचे सांगितले.

काल  प्रांत कार्यालयावर आदिवासी टोकरे कोळी जमातीचे बांधवांचे संविधानिक न्याय हक्क मागण्याकरिता शेकडोच्या संख्येने आंदोलन होते मात्र प्रांताधिकारी  हे शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा पवार व जयंतराव पाटील यांचा दौरा असल्याकारणाने कार्यालयात हजर राहू शकले नसल्या कारणाने  आदिवासी टोकरे कोळी जमातीचे शिष्टमंडळाने अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाट्यगृहात असलेल्या शिबिरात भेट घेतली. व तेथेच आदिवासी टोकरे, महादेव, मल्हार कोळी जमातीतर्फे निवेदन देण्यात आले.त्यानंतर  अजितदादांनी  प्रांत साहेबांना बोलावून  आदिवासी  कोळी जमातीच्या जाती दाखल्याच्या विषयावर चर्चा करून योग्य ते सहकार्य करण्याच्या सूचना केल्या.त्याचप्रमाणे
सदर विषय मुख्यमंत्री यांना कळवून आदिवासी विकास विभागाचे आयुक्त, सचिव यांचेसमवेत बैठक लावून देण्याचे आश्वासित करून येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात विरोधी पक्ष नेते म्हणून बाजू मांडणार असल्याची भूमिका स्पष्ट केली.  ही चर्चा घडवून आणण्यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष श्री.अरुणभाई गुजराथी, माजी आमदार श्री.कैलास बापू पाटील, चो.सा.का. अध्यक्ष श्री. चंद्रहास भाई गुजराथी, कृषी उ.बा. समिती संचालक श्री.घनश्याम आण्णा पाटील, अमळनेर तालुक्याचे आमदार श्री.अनिल भाईदास पाटील, ज्येष्ठ नेते श्री. सुनील पाटील, ज्येष्ठ नेते श्री.डी.पी.साळुंके सर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री.दीपक सोनवणे, ज्येष्ठ नेते श्री. तुकाराम पाटील, श्री.राजू भाटिया यांचे सहकार्य लाभले.
आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या वतीने अॕड.गणेश सोनवणे, श्री.शुभम सोनवणे, श्री.नामदेव येळवे यांच्या समवेत चोपडा व अमळनेर तालुक्यातील कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने