शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या 23 विद्यार्थ्यांची मुलाखतीतून निवड

 *शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या  23 विद्यार्थ्यांची  मुलाखतीतून निवड

चोपडा दि.१७(प्रतिनिधी) धुळे परिसरात *Macleod फार्मास्युटिकल लिमिटेड* कंपनीतर्फे *क्यू सी आणि प्रोडक्शन* विभागासाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीत चोपडा येथील शरदचंद्रिका सुरेश पाटील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील एकूण पंधरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यातून विराग आर. चौधरी, धीरज एस. पाटील, अजय एस.जाधव, निशांत एन. शर्मा, हिमांशू एस. पाटील आणि गोपाल डी. गोसावी या *६ विद्यार्थ्यांची प्रोडक्शन विभागात* तर भाग्यश्री डी. पाटील व भूषण एस.चव्हाण या  *२ विद्यार्थ्यांची QC विभागात* निवड झाली आहे. तसेच नाशिक येथे आयोजित *एडवांटमेंट फार्मा लिमिटेड* कंपनीतर्फे *मेडिकल कोडींग* या डिपार्टमेंट साठी घेण्यात आलेल्या मुलाखतीत महाविद्यालयाचे एकूण *12* विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यामध्ये श्रेयस जोशी, तेजस गोसावी, लक्ष्मण चौधरी, सचिन निंबायत, पौर्णिमा ठाकूर, अश्विनी बालापुरे, दीपक माडी, प्रियंका पाटील, अश्विनी भोसले, अश्विनी पाटील, चंद्रकांत तायडे व निकिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. *जी सी इंडिया डेंटल प्रायव्हेट लिमिटेड* यासारख्या जागतिक नामांकित कंपनीतर्फे *मार्केटिंग* या डिपार्टमेंट साठी प्रथम व द्वितीय फेरीत ऑनलाईन मुलाखत घेऊन अफताब शेख, रोहित गवळी व आकाश खर्चाणे या *3* विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात आली.

    विद्यार्थ्यांना अद्ययावत  तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी कॉलेजमध्ये अग्रक्रम दिला जातो, असे प्राचार्य डॉ. गौतम पी. वडनेरे यांनी सांगितले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय Adv. संदीप पाटील, उपाध्यक्ष आशाताई पाटील, सचिव डॉ. स्मिताताई पाटील, प्राचार्य. डॉक्टर गौतम वडनेरे, निबंधक.श्री

प्रफुल्ल मोरे व शैक्षणिक प्रमुख श्री. तनवीर शेख व श्री. तुषार पाटील, विभाग प्रमुख डॉ. भरत जैन, डॉ.संदीप पवार व डॉ. रागीब शेख तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. प्रेरणा जाधव आणि टीपीओ सहाय्यक डॉ. रूपाली पाटील व श्रेया जैन यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने