रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांनी पकडले अट्टल चोरट्यास.. जनतेने अलर्ट राहावे पोनि के.के.पाटील
चोपडा दि.२२(प्रतिनिधी).... चोपडा शहरात पोट्रोलिंग करतांना मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी एका चोरट्यांस शिताफीने अटक करून जेलची हवा दाखविली आहे.त्यामुळे काही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे* .
चोपड़ा शहरामध्ये घरफोडी तसेच वाहन चोरीच्या घटना घडलेल्या आहेत अशा प्रकारच्या घटनांना प्रतीबंध करण्यासाठी तसेच अशा प्रकारच्या घडलेल्या घटना उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार व अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे यांच्या आदेशान्वये तसेच सहा. पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले मार्गदर्शना खाली दररोज रात्री रात्रगस्त साठी 02 अधिकारी 08 कर्मचारी लावण्यात येत आहेत सदरचे अधिकारी हे रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या भागात गस्त तसेच आवश्यकते नुसार वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करीत आहेत
दि. 18/06/2023 रोजी रात्री 11.00 वा. पासुन सहा. पोलीस निरीक्षक अजित सावळे, सहा पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, पोना / प्रमोद पाटील, पोशि/ शुभम पाटील, पोकों/ मनोहर पवार, पोकों/सुमेर वाघरे पोका /प्रकाश ठाकरे, पोका / रविद्र बोरसे, पोकों/ आत्माराम अहीरे हे हद्दीत गस्त करीत असतांना सपोनि अजित सावळे व पोकों / रविंद्र बोरसे यांना गोगावले रोडवरील समर्थ पार्क कॉलनी परिसरात पहाटे 03.00 वा च्या सुमारास घरफोडी व वाहन चोरी करणारा रेकॉर्डवरील आरोपी प्रशांत जगन वाडे रा. गोरगाव ता. चोपडा हा संशयीत रित्या फिरतांना मिळुन आला त्यास ताब्यात घेवून विचारपुस करता त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर पोलीसांनी त्याचे जवळ असलेल्या काळ्या रंगाच्या पिशवीची झडती घेतली असता त्यात घरफोडी करण्यासाठी लागणारे साहीत्य एक लोखंडी टॅमी दोन मोठे स्क्रुडायव्हर अनेक प्रकारच्या चाबी पकड तसेच एक लॅपटॉप इत्यादी साहीत्य मिळुन आले त्याबाबत विचारपुस केली असता त्याने कोणतेही समाधान कारक उत्तर न दिल्याने सदर आरोपी याने घरफोडी चोरी केलेली असावी याची पोलीसांना खात्री झाल्याने पोलीसांनी त्यास ताब्यात घेवुन त्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे
वरिल प्रमाणे अटकेतील आरोपीने आज पहाटे 02.00 ते 03.30 वा. च्या सुमारास महेंद्र बाळु पाटील रा. तुळजाभवानी नगर यांचे बंद घराचे कुलूप तोडुन सदर घरातुन 01 लॅपटॉप चांदीची वाटी, चमचा, 02 पैंजण व 7000/-रु चोरी केल्याचे निष्पन्न झालेले आहे सदर आरोपीवर घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात • आलेला असुन त्याचेकडुन गुन्ह्यातील उर्वरीत मुद्देमालासह एकुण 35000/- रु कि.चा मुद्देमाल व एक चोरीची अॅक्टीवा मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेली आहे सदर आरोपीने अजुन अशाच प्रकारचे गुन्हे केलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या दृष्टीने सदर आरोपी यास अधिक विचारपुस करुन जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहोत,
,
शहरात असे गुन्हे घडू नये व त्यास प्रतीबंध व्हावा यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीसां तर्फे शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये मिटींग घेवून नागरीकांना कॉलनी मध्ये जास्तीत जास्त ठिकाणी सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवीण्याबाबत तसेच सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत घराच्या आजुबाजुला पुरेसे लाईट चालु ठेवण्याबाबत व कॉलनीतील पोलीस मित्रांनी रात्रीच्या वेळेस पोलीसां बरोबर गस्त करुन गुन्ह्यांना प्रतीबंध करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी केले आहे