गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची सेवा म्हणजे गरीब पेशंटला जीवन वरदायिनी! _[ हिरालाल मानसिंग चव्हाण यांचा पाच दिवसीय अनुभव ]_
गुलाबराव देवकर म्हटले म्हणजे लगेच देव माणूस असा शब्द तात्काळ मुखातून बाहेर पडतो... खरंच राजकीय व्यक्तींनी काही चांगलं करायचे ठरवले तर भरपूर काही करता येते, उदाहरण म्हणजे गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सेवा घडविण्यासाठी शिरसोली रोडला सुसज्ज भव्य इमारतीत हॉस्पिटलचे रोपटे उभे केले आहे. माझे पाच दिवसाचे अनुभवानुसार अनेक प्रकारचे पेशंट ट्रीटमेंट साठी येतात 24 तास तत्पर सेवा देणारे म्हणजे डॉक्टर श्री नितीन पाटील सर यांना मी खूप जवळून पाहिलेला आहे त्यांच्यासारखे सेवा देणारे देशामध्ये निस्वार्थ भावनाचे व्यक्ती जर मिळाले तर देशाचा भवितव्य आणि गोरगरिबाचे कल्याण होण्यास जास्त वेळ आणि काळ लागणार नाही. या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारचे योजनामध्ये 996 आणि नव्याने समाविष्ट केलेले 213 असे 1296 मोफत उपचार शास्त्रक्रिया करण्यात येते. काही योजनांमध्ये संपूर्ण मोफत मध्ये उपचार करण्यात येते. त्याचबरोबर नाश्ता जेवण चहा वगैरे मोफत देण्यात येते. त्यामुळे गोरगरिबांचा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद थेट आप्पा साहेब तसेच आप्पासाहेबांच्या परिवाराला जाऊन मिळतो *आकाशात पतीत तोय यथा गच्छथिसागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छथि* अर्थ आकाशीतील पाणी प्रत्येक थेंब थेंब साचून जसं समुद्रात जाऊन मिळते त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या मिळालेला आशीर्वाद आप्पासाहेबांना मिळत असतो. मी माझ्या पत्नीला या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टर श्री नितीन पाटील सर* यांनी पूर्ण व्हीआयपी व्यवस्था माझ्यासारखा सर्वसाधारण व्यक्तीसाठी अल्प दरात केलेली आहे. मी त्यांचा यासाठी कायम ऋणी राहील. तसेच भव्य दिव्य हॉस्पिटल हे रोपटे वटवृक्षात रूपांतरीत व्हावे ह्या माझ्या व माझ्या परिवार व मित्रमंडळीतर्फे संपूर्ण डॉक्टर्स नर्स स्टाफ तसेच कर्मचारी यांना पुढील सेवा देण्यास हार्दिक शुभेच्छा देतो !
अनुभवधारक - हिरालाल मानसिंग चव्हाण
मु. पोखरी तांडा पो. वराड तालुका धरणगाव जिल्हा जळगाव हल्ली मुक्काम धरणगाव.
» *अध्यक्ष* राष्ट्रीय बंजारा टायगर्स तालुका धरणगाव
»» *अध्यक्ष* बंजारा समाज सेवा बहुउद्देशीय संस्था पोखरी तांडा (रजि)
»» *सचिव* अनुदानित वस्तीगृह कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा.