एक दिवशीय तालुकास्तरीय उन्हाळी बालसंस्कार शिबिर संपन्न

 एक दिवशीय तालुकास्तरीय उन्हाळी बालसंस्कार शिबिर  संपन्न.


 धरणगाव,दि. ७(प्रतिनिधी):  येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित धरणगाव येथे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व दादासाहेब नितीन दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 7 मे  रविवार रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 12.00 या वेळेत केंद्रात बालसंस्कार विभाग अंतर्गत बालसंस्कार शिबिर घेण्यात आले त्यात सुमारे 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

 सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सूर्यनमस्कार तसेच अध्यात्मिक सेवा त्यात गणपती अथर्वशिर्ष गणपती स्तोत्र प्रज्ञाविवर्धन स्तोत्र रामरक्षा गायत्री मंत्र गणेश गायत्री मंत्र सूर्य मंत्र स्मरणशक्ती वाढवणारे स्तोत्र व मंत्र पठण करण्यात आले व यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच आदर्श दिनचर्या व पाच गुणांचे महत्त्व विशद करण्यात आले बाल संस्कार व्हिडिओ सादरीकरण  करण्यात आले तसेच विविध स्टॉल प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले स्वसंरक्षण तसेच सीडबॉल बनवणे विज्ञान प्रदर्शन विषयी संपूर्ण माहिती देण्यात आली पसायदान व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली व नंतर सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.कार्यक्रम यशस्वी साठी तालुका प्रमुख राकेश मकवाणे केंद्रप्रमुख आर पी पाटील सर बालसंस्कार तालुका प्रतिनिधि प्रवीण बडगुजर चंदाताई पवार दिनेश सूर्यवंशी अमिता भाटिया सुनंदा पाटील अनिता झांबरे वैशाली घोडेस्वार वैशाली पाटील सुवर्णा कासार बबलू चौधरी गौरव वाणी प्रदिप महाजन वसंत पाटील प्रशांत फुलपगार पंकज चौधरी चेतन पाटील कुणाल ठाकरे व केंद्रातील सर्व  सेवेकरी परिवाराने सहकार्य केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने