अमळनेर संत सखाराम महाराज पालखी यात्रोत्सवात प्रल्हाद बाविस्कर कुटुंबियांकडून महाप्रसाद वाटप.. दरवर्षाची परंपरा अखंडीत
*चोपडा,दि.६(प्रतिनिधी ):* अमळनेर येथील संत सखाराम महाराज यात्रोत्सवातील पालखी उत्सवात गेल्या अनेक वर्षांपासून प्रल्हाद बाविस्कर व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका लक्ष्मी बाविस्कर भाविकांसाठी महाप्रसाद वाटप करतात. त्यांनी ही परंपरंपरा अखंडित ठेवली असून, त्यांच्या दातृत्वाचे भाविकांकडून तसेच संत सखाराम महाराज वाडी संस्थानकडून कौतुक होत आहे. श्री. बाविस्कर कुटुंबीय सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असते. समाजातील सर्वच स्तरातील गरजूंना ते नेहमी मदतीचा हातही देत असतात.
प्रल्हाद बाविस्कर यांच्या पत्नी लक्ष्मी बाविस्करह्या नगरसेविका असताना त्यांनी अनेक विकासकामे केली आहेत. त्यांची नागरिकांशी नाळ जुळलेली असून, वर्षभर ते विविध सामाजिक उपक्रम राबवितात. विशेष म्हणजे संत सखाराम महाराज यात्रोत्सवात पालखी उत्सवात ते महाप्रसाद वाटप करतात. भाविकांनी त्यांच्या या कार्याचे कौतुक केले आहे.
याप्रसंगी कोळी समाजांचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोळी व उपअध्यक्ष गणेश बाविस्कर, निंबा भोई व अनिल चौधरी, श्रीकृपा मंडप, अनिल कोळी, प्रकाश कोळी, अजय पौडवाल, हिम्मत चौधरी व ईच्छा देवी मित्र मंडळाचे (जळगाव ) पोलीस दलांचे विशेष सहकार्य लाभले.