चोपडा भारतीय जनता पार्टी तर्फे द.केरला स्टोरी चित्रपट प्रदर्शित करण्याची मागणी

 चोपडा भारतीय जनता पार्टी तर्फे द.केरला स्टोरी चित्रपट प्रदर्शित करण्याची मागणी

======================

     


  चोपडा दि.७(प्रतिनिधी)  चोपडा शहरातील आशा टाॅकीज व्यवस्थापकास चोपडा भारतीय जनता पार्टी तर्फे (द.केरला स्टोरी) चित्रपटाचे प्रसारण करण्यात यावे असे निवेदणाद्वारे कळविण्यात आले तसेच महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण देशात द.केरला स्टोरी चित्रपटाचे प्रदर्शन होत असतांना आपल्या चोपडा शहरात देखिल लवकरात लवकर द. केरला स्टोरी चित्रपटाचे प्रसारण करण्यात यावे अशी मागणी चोपडा भारतीय जनता पार्टी तर्फे शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

 तसेच चित्रपट वितरक महाराष्ट्र श्री सारंग चांडक यांच्या शी शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता श्री सारंग चांडक यांनी दोन तीन दिवसात चोपड्यात चित्रपट प्रदर्शित करू असे आश्वासन दिले तरी देखिल चित्रपट सुरू न झाल्यास चोपडा भाजपा तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या आंदोलनात काही नफा नुकसान झाल्यास टाॅकीचे चालक मालक जबाबदार राहतील असे देखिल या वेळेस शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल यांनी सांगीतले तसेच निवेदनातून पोलिस प्रशासनाला देखिल विनंती करण्यात आली की, द केरला स्टोरी चित्रपट बघायला जास्तीत जास्त महिला वर्ग उपस्थित राहणार आहे तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने चित्रपट प्रसारित होत असलेल्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेऊन सहकार्य करावे अशा सुचना देण्यात आल्यात.

 यावेळी  शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल,सरचिटणीस मनोहर बडगुजर,युवा मोर्चा जिल्हा सदस्य तुषार पाठक,जैन प्रकोष्ट तालुकाध्यक्ष संजय जैन,शहर उपाध्यक्ष संदिप चव्हाण, सोशल मिडीया अॅप प्रमुख धर्मदास पाटील,राजेंद्र मराठे,संजय माळी,राजू महाजन, पंकज महाजन,दिलीप माळी,हर्षल मराठे,हर्षल पाटील,धनंजय बारी,सागर चौधरी या सह शहरातील कार्यक्रते पदाधिकारी उपस्थित होते


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने