गौतम बुद्ध यांनी मानवा मानवात प्रेमाचे नाते निर्माण केले --- जयसिंग वाघ

 गौतम बुद्ध यांनी मानवा मानवात प्रेमाचे नाते निर्माण केले       ---    जयसिंग वाघ 

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

  


   जळगाव दि.७(प्रतिनिधी):- अनादिकाळा पासून जगात

 टोळी  युद्ध होत आले , पुढं राजेशाही आली तेंव्हा युद्व करणे राजधर्म ठरला यात मानवी हत्या मोठ्या प्रमाणात होत गेली , मानवी जीवन असुरक्षित झाले , अश्या सामाजिक , राजकीय अवस्थेत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी शांतता व अहिंसा हे तत्व सांगून युद्ध रोखले व मानवा मानवांत प्रेमाचे नाते निर्माण करुन मानवी जीवन सूखकर केले . असे विचार प्रसिद्ध साहित्तीक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी कानळदा येथील बुद्ध जयंती निमित्त आयोजित जाहिर सभेत व्यक्त केले .

         जयसिंग वाघ यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की , गौतम बुद्ध यांनी केवळ शांतता , अहिंसा हीच तेत्वे सांगितली नाही तर समता , स्वातंत्र , बंधुता , न्याय , स्त्री पुरुष समानता या  तत्वाची मुहूर्तमेढ रोवून सर्व जगाची विचार करण्याची दिशाच बदलून टाकली . गौतम बुद्ध यांनी दिलेले पंचशील बौद्ध धर्मियांची प्रार्थना बनली की जी स्वतः स्वतःला बदलविन्याचा संकल्प करते .ही प्रार्थना म्हणजे मी हिंसा , चोरी , व्यभिचार करणार नाही , खोटे बोलणार नाही व दारू पीणार नाही असे आपल्या कडून वदवून घेते , या संकल्पने प्रमाणे आपण जगलो तर आपण , आपले कुटुंब  सुखानेच जगणार एवढी ताकत त्यात आहे असेही जयसिंग वाघ यांनी स्पष्ट केले . 

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पुंडलिक सपकाळे होते त्यांनी गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवुन दिलेल्या मार्गाने चालणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य असल्याचे सांगुन या महामानवांचे कार्य अतुलनीय आहे , त्यांचे विचार व कार्य हे भविष्यात सुद्धा दीपस्तंभ प्रमाणे मार्गदर्शन करत राहतील असे विचार व्यक्त केले .

         बाबूराव वाघ यांनी त्रिशरण व पंचशील हे मानवी जीवनात खूप महत्वाचे असून प्रत्येकाने त्याचे पालन करावे असे आवाहन केले . त्यांनी बुद्ध जीवनातील विविध प्रसंग विस्तारपूर्वक मांडून त्याचे अर्थ सांगितले , बुद्ध विचार हे केवळ विचार नसून ते मानवी जीवनाचे तत्त्व आहे असेही त्यांनी सांगितले. 

          प्रास्ताविक आ. बा. सपकाळे यांनी तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जगदीश  

सपकाळे यांनी केले . सुरवातीस भगवान गौतम बुद्ध , डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले , त्या नंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली शेवटी खीर दान करण्यात आले , सभेस स्त्री पुरुष मोठ्या संखेने हजर होते .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने