ती बस पुन्हा सुरु होणार.. चोपडा शहर भाजपाचे निवेदन

ती जळगाव बस पुन्हा सुरु होणार.. चोपडा शहर भाजपाचे निवेदन 

======================

 


   *चोपडा,दि.13(प्रतिनिधी): चोपडा ते धरणगाव मार्गे जळगाव रात्रीची ८:३० व १०:०० वाजेची पुर्ववत बस  पुन्हा करावी अशी मागणी शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने  चोपड्याचे आगार प्रमुख श्री महेंद्र पाटील यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

 यावेळी शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल व  संपुर्ण टीम ने सविस्तर चर्चा करून आगार प्रमुख यांच्या लक्षात आणून दिले की चोपडा कडून जळगाव कडे जाणार्‍या व जळगाव कडून चोपडा कडे येणाऱ्या  तालुक्यातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात व रात्र रात्र भर बस स्टाॅप वर मुक्काम करावा लागतो त्या त्रास पासुन प्रवाशांची सुटका व्हावी म्हणून लवकरात लवकर ही बस पुर्णवत सुरू करावी अशी विनंती  आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या कडे केली असता  त्यांनी येत्या दोन तीन दिवसात बस सुरू करण्याची ग्वाही दिली आहे.


       *याप्रसंगी शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल,व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे,युवा मोर्चा जिल्हा सदस्य तुषार पाठक,सरचिटणीस मनोहर बडगुजर,जैन प्रकोष्ट तालुकाध्यक्ष संजय जैन,शहर उपाध्यक्ष गोपाल पाटील,युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष संदिप चव्हाण,अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष प्रेम घोगरे,युवा मोर्चा सरचिटणीस आकाश नेवे,सोशल मिडीया अॅप प्रमुख धर्मदास पाटील,एमआयडीसीचे चेअरमन देविदास (पप्पू) सोनार आदी उपस्थित होते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने