अखेर अमळनेर प्रांताधिकाऱ्यांकडून अनुसूचित जमातीचे 60 जात प्रमाणपत्र दाखले निर्गमित.. सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांच्या अन्न त्याग सत्याग्रह आंदोलनाला यश

 

अखेर अमळनेर प्रांताधिकाऱ्यांकडून अनुसूचित जमातीचे 60 जात प्रमाणपत्र दाखले निर्गमित.. सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांच्या अन्न त्याग सत्याग्रह आंनदोलनाला यश




चोपडा दि. १३ (प्रतिनिधी महेश शिरसाठ) :  _आदिवासी कोळी समाजाच्या वतीनेअमळनेर प्रांताधिकारी कार्यालयांवर सामाजिक कार्यकर्ते श्री.जगन्नाथबापू  बाविस्कर यांनी पुकारलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाचा लढा  यशस्वीरित्या पार पडला असून प्रभारी प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आंदोलनाची पाचव्या दिवशी दखल घेत  प्रलंबित अनुसूचित जमातीचे ६० जात प्रमाणपत्र वितरण करून कोळी समाजास न्याय दिल्याने सत्याग्रही  समाज बांधवांना लिंबू सरबत देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.यावेळी प्रांताधिकाऱ्यांचे आभार मानून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आद्यकवी महर्षी वाल्मिकीं, छत्रपती शिवरायांचा नावाचा जयघोषाने परिसर दणाणून सोडला याआंदोलनामुळे आता अमळनेर व चोपडा तालुक्यातील शेकडो समाज बांधवांना टोकरे कोळीचे (एस.टी.) दाखले मिळणार आहेत._

दि. ८ मे पासून अमळनेर येथील प्रांत कार्यालय समोर  आदिवासी टोकरे कोळीचे जातप्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे यासाठी चोपडा महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्क प्रमुख जगन्नाथ बाविस्कर गोरगावलेकर यांनी समाज बांधवांसह तीव्र अन्नत्याग सत्याग्रह सुरू केलेला होता.  आंदोलनाची दखल घेत पाचव्या दिवशी प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्या हस्ते जगन्नाथ बाविस्कर यांना सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले. याप्रसंगी ऍड. गणेश सोनवणे, माजी पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग, बाळासाहेब सैंदाणे, योगेश बाविस्कर, नामदेव येळवे, गोपाळराव सोनवणे, शुभम सोनवणे, प्रकाश खन्ना, गुलाबराव बाविस्कर, प्रल्हाद कोळी, लखीचंद बाविस्कर, हिलाल सैंदाणे, सुखदेव कोळी, रामचंद्र सपकाळे, कैलास सोनवणे, गोविंदा कोळी, एस कुमार पेंटर, गोपाळ बाविस्कर, विठ्ठल कोळी, गोपीचंद कोळी, प्रशांत सोनवणे, राकेश कोळी, चंद्रकांत कोळी, वसंत कोळी, मनोज कोळी, मनोहर साळुंखे, पंकज बाविस्कर, विजय सैंदाणे, सागर कोळी, भूषण कोळी, डॉक्टर भिकन शिरसाट, गणेश कोळी, वैभवराज बाविस्कर, भाऊसाहेब बाविस्कर, समाधान सोनवणे, रामभाऊ बाविस्कर, डॉक्टर गोकुळ बिराडे, विशालराज बाविस्कर, निर्मला पाटील, आशाबाई बाविस्कर, सावित्रीबाई बाविस्कर, निर्मला बाविस्कर, कस्तुरबाई बाविस्कर, यांचे सह  समाज बांधव, पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.



आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या वतीने ऍड. गणेश सोनवणे, युवा संघटक शुभम सोनवणे यांनी कायदेशीर रित्या बाजू मांडून सामाजिक दर्जा नुसार व कायदेशीर पुरावे मांडून कोळी नोंदीवरून टोकरे कोळी जमातीचे स्पष्टीकरण केले. सदर स्पष्टीकरण मा. प्रांत अधिकारी श्री. कैलास कडलग साहेबांनी समजून घेत  जमातीला साठ जातीचे दाखले निर्गमित केले. साहेबांच्या जमातीविषयी असलेल्या न्यायिक व सकारात्मक भूमिकेचे राज्यभरातून आदिवासी कोळी जमातींनी आभार व्यक्त केले. सर्व आदिवासी टोकरे, महादेव, मल्हार कोळी जमात बांधवानी सविधानाचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा, आद्यकवी महर्षी वाल्मिकींचा छत्रपती शिवरायांचा नावाचा जयघोष करत उपोषणाची सांगता करण्यात आली.शासनाचे, प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.
अन्नत्याग सत्याग्रह प्रसंगी कोळी महासंघ व कोळी समाज पंच मंडळ अमळनेर यांचे विशेष सहकार्य लाभले. या प्रसंगी पोलीस अधिकारी राकेश जाधव, व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. या संदर्भात, जगन्नाथ बाविस्कर म्हणाले की, मी आणि माझे सहकारी हे समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी सतत लढत राहतील. समाजासाठी वाटेल ते करू, जिंकू किंवा मरू यातत्त्वनुसार हा लढा यशस्वी झाला आहे. यापुढेही समाज बांधवांसाठी असाच लढत राहील असे महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्क प्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने