महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा अडीच किलो चांदी चोरी..चौघे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
चोपडा दि.१४(प्रतिनिधी ):-* शहरातील मेन रोड वरील व मिलाप स्टोअर्स समोरील सोन्या चांदीच्या महालक्ष्मी ज्वेलर्स मध्ये मध्य रात्री तीन वाजून चार मिनिटांनी चोरटे दुकानाजवळ आले व तीन वाजून पंधरा मिनिटांनी चोरी करून पसार झाल्याची घटना घडली आहे. सदर दुकानाचे शटर हे कटरने कापले असून दुकाना मध्ये दोन चोरटे आत गेले व तीन चोरटे बाहेर उभे होते असे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे असे दुकानाचे मालक हेमकांत जैन यांनी सांगितले. त्यानंतर वरती राहणारे रहिवाशी जागे झाले असता व त्यांनी आरडाओरड केली असता चोरटे घटनास्थळावरून पसार झाले आहेत. चोरट्यांनी दुकानातून दोन ते अडीच किलो चांदीचे वस्तू चोरी केली आहे असे दुकानाचे मालक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
घटनास्थळी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पीआय के के पाटील आपल्या स्टाफ सह पोहचले असता सर्व शक्यतांची पडताळणी करून नाकेबंदी केली असल्याचे समजते. तसेच सकाळी पाच वाजेपर्यंत त्यांनी चोरीची घटनेची चौकशी केली आहे. चोरटे हे व्हॅगनार कार मध्ये आले होते. सिल्वर कलरची व्हॅगनार कार होती तिचा नंबर एम एच ०९ ए क्यू १५५९ असल्याचे समजते....