खिरोदाचे तलाठी व कोतवाल लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात.. चार हजार रुपयांची लालच पडली महागात..
काल्पनिक चित्र
जळगाव दि.०६(प्रतिनिधी): रावेर तालुक्यातील खिरोदा येथील तलाठी कार्यालयातील तलाठी प्रमोद प्रल्हाद न्हायदे व कोतवाल शांताराम यादव कोळी यांना सातबारा उताऱ्यावर मयताचे वारसाचे नाव लावण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना जळगाव लाच लूचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडून पोलिसात गुन्हा नोंदविला आहे .सध्या जळगाव जिल्ह्यात लाचखोरांची संख्या वाढत असतांना लाच लूचपत प्रतिबंध विभागाचे अधिक्षक शशिकांत पाटील ह्यांनी आपला बडगा चांगलाच उगारला असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खिरोदा येथील रहिवासी तक्रारदार यांची वडीलोपार्जीत शेती खिरोदा तलाठी कार्यालयाचे हद्दीमध्ये आहे. तक्रारदार यांचे मोठे भाऊ मयत झालेले असल्याने सदर शेत जमीनीचे ७/१२ उताऱ्यावर मयत भावाची पत्नी व मुलगा यांचे नावे वारस म्हणून नोंद घेण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे तलाठी प्रमोद प्रल्हाद न्हायदे , वय-४५ वर्ष,व कोतवाल शांताराम यादव कोळी , वय-५२ वर्ष, यांनी संगनमताने ४,०००/रु. लाचेची मागणी केलेली होती. सदर मागणी केलेली लाच रक्कम स्विकारतांना जळगाव लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलाठी व कोतवाल यांना रंगेहाथ पकडून सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे..
ही कडक कारवाई नाशिक परिक्षेत्र विभागाच्या पोलीस अधीक्षक , श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम,
अप्पर पोलीस अधीक्षक,श्री.एन.एस.न्याहळदे
वाचक पोलीस उप अधीक्षक,श्री.नरेंद्र पवार व सापळा पर्यवेक्षण अधिकारी पोलिस उप अधीक्षक
श्री.शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस निरीक्षकएस.के.बच्छाव,,
पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने,स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर.यांच्या पथकाने केली