आधार संस्था व विप्रो कंपनीचे कार्य डोळे दीपवणारे..गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील
अमळनेर दि.०६(प्रतिनिधी): अमळनेर तालुक्यातील ५०००गरिब विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करुन काहींना चष्मे पुरवून मोलाचा हात देण्याचे काम आधार संस्था व विप्रो कंपनीने केले आहे हे कार्य डोळे दीपवणारेअसेच आहे असे प्रतिपादन एका कार्यक्रमप्रसंगी गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी केले आहे.
मागील चार महिन्यापासून आधार संस्थेने ,विप्रो इंटरप्राईजेस अमळनेर यांच्या सहाय्याने ग्रामीण भागात तील माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी विशेष डोळे तपासणीची मोहीम राबवली ज्यात तालुक्यातील 30 ग्रामीण माध्यमिक शाळांचा समावेश होता प्रत्येक शाळेत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले व नंतर ज्यांना चष्म्याची आवश्यकता होती त्यांना चष्मे वाटप करण्यात आले तसेच ज्यांना डोळ्यांच्या विशेष समस्या होत्या त्यांना अमळनेर येथील गणेश हॉस्पिटल येथे नेत्ररोग तज्ञ डॉ.राहुल मुठे आणि डॉ. बिराज मुठे यांच्याकडून विशेष तपासणी करण्यात आली ज्यात तालुक्यातील 5000 मुलांची डोळे तपासणी झाली व चौदाशे मुलांना चष्मे वाटप करण्यात आले 36 विशेष मुलांना इतर तपासण्यांचा लाभ देण्यात आला या मोहिमेची सांगता आज शिरूर येथे व्हीं झेड पाटील माध्यमिक शाळेत चष्मे वाटप करून करण्यात आली आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून तालुका गटशिक्षणाधिकारी माननीय विश्वास पाटील सर उपस्थित होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या उपक्रमाबद्दल आधार संस्था आणि विप्रो कंपनीचे विशेष आभार मानले व पुढील सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाला विप्रो इंटरप्राईजेस कडून श्री चेतन थोरात एच आर मॅनेजर ,जितेंद्र शर्मा क्वालिटी मॅनेजर आणि सुधीर बडगुजर वेल्फेअर ऑफिसर तसेच आधार संस्थेकडून डॉ. भारती पाटील अध्यक्ष , श्रीमती रेणू प्रसाद कार्यकारी संचालक प्रकल्प समन्वयक निकिता पाटील,नंदिनी मैराळे तोसीब शेख हे उपस्थित होते मुख्याध्यापक श्री शिंदे सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमला उपस्थित होते.