चोपड्यात भारतीय जनता पार्टी वर्धापनदिन साजरा

 

चोपड्यात भारतीय जनता पार्टी  वर्धापनदिन  साजरा
====================





  • चोपडा दि.०७(प्रतिनिधी): दिनांक ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टी चा वर्धापनदिन चोपडा शहरातील हाॅटेल गुरुदत्त येथे संपन्न झाला . कार्यक्रमाच्या प्रारंभी भारत मातेचे पुजन करून माल्यार्पण करून भाजपाचा ध्वज फडकविण्यात आला तद्नंतर भारतीय जनता पार्टी  चोपड्यात जिवंत रहावी यासाठी जिवाचे रान ज्यांनी केले त्या तिलकचंद शहा व मुन्ना शर्मा यांचा  व  हनुमान जन्मोत्सव निमित्त भजन संध्या साठी आलेले दिव्य दृष्टी नसलेले ५ दिव्यांग बांधवाचा या वेळेस शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

        याप्रसंगी माजी सभापती आत्माराम म्हाळके,तालुका अध्यक्ष पंकज पाटील,शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल,जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, विधानसभा श्रेत्र प्रमुख प्रदीप पाटील,व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे,जेष्ठ नेते बाळासाहेब सोनवणे,माजी तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील,सरचिटणीस मनोहर बडगुजर,बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा सदस्य लक्ष्मण पाटील,महीला मोर्चा जिल्हा चिटणीस सौ रंजनाताई नेवे,महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सौ ज्योस्त्नाताई चौधरी,महीला मोर्चा शहर उपाध्यक्ष सौ अनिता नेवे,चुचाळे ग्रामपंचायत सदस्य सौ विमलबाई ,सहकार आघाडी शहर अध्यक्ष कैलास पाटील,शहर उपाध्यक्ष गोपाल पाटील,शक्तिकेंद्र प्रमुख बापुराव पाटील,चिटणीस भरत सोनगिरे,भाजप नेते जितेंद्र चौधरी,शक्तिकेंद्र प्रमुख बळीराम बारेला,सोशल मिडीया शहर प्रमुख आकाश नेवे,सोशल मिडीया अॅप प्रमुख धर्मदास पाटील,दिपक चौधरी,पवन पाटीलया सह पदअधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने