महात्मा फुले जयंती निमित्त शासकीय सुट्टी द्यावी ..विविध संघटनांची मागणी

 महात्मा फुले जयंती निमित्त शासकीय सुट्टी द्यावी ..विविध संघटनांची मागणी


------------------------------------------------------

जळगावदि.७(प्रतिनिधी) :-  महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त ११एप्रिल रोजी सर्व शासकीय , निमशासकीय , बैंक , कंपनी आदिना सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय शासनाने घ्यावा अशा आशयाचे निवेदन विविध संघटनांतर्फे जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना नुकतेच देण्यात आले . सार्वजनिक सुट्टी असल्यास महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त व्यापक कार्यक्रम घेता येतात तसेच विविध शासकीय , निमशासकीय कर्मचारी , अधिकारी त्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होउ शकतात असे निवेदनात नमूद केले आहे .

         निवेदन देते वेळेस प्रसिद्ध साहित्तीक व विचारवंत जयसिंग वाघ , प्रसिद्ध सत्यशोधकीय नेते मुकुंद सपकाळे , प्रसिद्ध साहित्तीक डॉ मिलिंद बागुल , सत्यशोधक समाजाचे राज्य उपाध्यक्ष सुधाकर बडगुजर , प्रसिद्ध कवी विजय लुल्हे प्रत्यक्ष हजर होते . 

         या मागणीस राजेश पाटील , साहेबराव वानखेड़े , सुरेश तायड़े , सदाशिव सोनवणे , अरुण वान्द्रे , डॉ प्रदीप सुरवाड़कर यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे .

           या मागणी करीता शासनाचे लक्ष वेधण्या करीता दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी दहा पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात येणार आहेत . शासनाने ११ एप्रिल रोजी शासकीय सुट्टी जाहीर न केल्यास विविध प्रकारचे आंदोलन सुरु करण्यात येईल असा इशारा सुद्धा या संघटनांतर्फे जाहीर करण्यात आले आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने