नासिक आम आदमी पार्टीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
नाशिक दि.१६(प्रतिनिधी). दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित् आम आदमी पक्ष नाशिक समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी एड. अभिजीत गोसावी आप युवा महाराष्ट्र अध्यक्ष यांनी डॉ. बाबासाहेब त्यांच्या जीवन कार्याबद्दल सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्यावेळेस ते म्हणाले बाबासाहेब भारत देशातील इतिहासातील सर्वात मोठे चमकणारे चांदण आहे त्यांच्या जीवन कार्याचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की त्यावेळेस अत्यंत गरीब परिस्थिती जन्म घेऊन जातीय भेदभावाच्या काळाच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले तसेच 1913 यासाठी अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी त्यांचे पीएचडी चे शिक्षण केले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून पीएचडी घेतली तसेच ग्रेस इन येथून त्यांनी त्यांची वकिलीची पदवी प्राप्त केली अशा व्यक्तीने भारतातच संविधान लिहिले त्यांच्या प्रत्येक लिखाणातून त्यांनी शिक्षणावर सर्वात जास्त भर दिला व उत्तम शिक्षण घेतल्यास तुमची गरिबी कायमस्वरूपी दूर होईल हा संदेश कायम त्यांनी सर्व दलित समाजाला दिला. त्याप्रसंगी काठी गल्ली नाशिक शंकर नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अमर गांगुर्डे आप युवा अध्यक्ष नाशिक शहर गिरीश उगले पाटील कार्याध्यक्ष नाशिक रोड देवळाली विधानसभा, श्वेतांबरी आहेर महिला अध्यक्ष नासिक पूर्व विधानसभा यांनी पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी स्वप्निल घीया दीपक सरोदे प्रदीप लोखंडे महेंद्र मगर निर्मलाताई दानी शांताबाई बनकर मीना जाधव ,पुष्पा अहिरे,लता सोनवणे शकुंतला वाघ इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.