जनता हायस्कूल मध्ये महामानव बाबासाहेब आंबेडकरांना जयंती निमित्त अभिवादन

 जनता हायस्कूल मध्ये महामानव बाबासाहेब आंबेडकरांना जयंती निमित्त अभिवादन

   *शिंदखेडा दि.१६(प्रतिनिधी):  येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे संपूर्ण विश्वातील तरुणांचे आदर्श असलेले बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली* 

    *कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष श्री अमजद मेहमूद कुरेशी खजिनदार श्री देवेंद्र पोपटराव बोरसे संस्था सचिव श्रीमती मीरा मनोहर पाटील ज्येष्ठ संचालक श्री अशोक गैधल पाटील प्रा श्री जितेंद्र पाटील प्राचार्य श्रीमती एम.डी.बोरसे पर्यवेक्षक श्री उमेश देसले ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस एस बैसाने श्रीमती एस एस पाटील श्री डी के सोनवणे वरिष्ठ लिपिक श्री किशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते* 

  *कार्यक्रमाचे औचित्य साधून  बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित  नाटिका, समूहगीत, तसेच त्यांच्या जीवन चरित्राची माहिती मिळावी म्हणून वकृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. तसेच वकृत्व स्पर्धेत तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थिनी भूमिका रवींद्र पिंपळे,गितेश्वरी राजेंद्र पाटील या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला* * 

   *बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा व त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय विद्यार्थिनी योगिता समाधान पानपाटील व कल्याणी संतोष पाटोळे  यांनी आपल्या भाषणातून करून दिला* .

      *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील तर मान्यवरांचे आभार श्री ए टी पाटील यांनी मानले* . 

   *कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले* .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने