एक पाण्याचे भांडे चिमण्यांसाठी... रोटरी क्लब चार उपक्रम

 एक पाण्याचे भांडे चिमण्यांसाठी... रोटरी क्लब चा उपक्रम

 चोपडा दि.१६(प्रतिनिधी):सध्या आपल्या आजूबाजूला चिमण्यांचे दर्शनच दुर्मिळ झाले आहे. शहरांमध्ये सामान्यत: आढळणारी चिमणी म्हणजेच 'इंडियन कॉमन स्प्रॅरो'चेही दर्शन दुर्मिळ होणे हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे 'एक पाण्याचे भांडे चिऊसाठी' या उपक्रमासाठी रोटरी क्लब चोपडा तर्फे 100 पाण्याचे भांडे सर्व रोटरी सभासदांना देण्यात आले.

वाढते तापमान, प्रदूषित नालेनद्या, वाढते काँक्रिटीकरणामुळे चिमण्यांसह अनेक पक्ष्यांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण होत आहे. मानवी वस्तीवर अवलंबून असलेल्या चिमण्यांना पूर्वी सार्वजनिक नळकोंडाळ्यांवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटायचा. पिण्यायोग्य पाणी न मिळाल्याने उन्हाळ्याच्या दरम्यान अनेक पक्ष्यांचा मृत्यू होतो. 

त्यामुळे नागरिकांनी चिमण्यांसह इतर पक्षांना जगवण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्या घराच्या गॅलरीत, गच्चीत किंवा अंगणात एखादे तरी पाण्याचे भांडे ठेवावे असे आवाहन रोटरी क्लब चोपडा चे अध्यक्ष यांनी केले आहे.

पाण्याचे भांडे ठेवताना घ्यावयाची काळजी -

- पाण्याचे भांडे मातीचे आणि उथळ असावं.

- भांडे दररोज स्वच्छ करून भरून ठेवावे. 

- पक्ष्यांना दिसेल अशा पद्धतीने ठेवावे.

- पाण्याचे भांडे सुरक्षित ठिकाणी किंवा उंचीवर असावं.

नागरिकांनी आपल्या घराच्या बाल्कनीत, टेरेसवर, गच्चीवर पाण्याचं एक भांडे भरून चिमण्या आणि इतर पक्ष्यांसाठी ठेवावे. त्यामुळे कडक उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी मिळू शकेल. एक दिवसापुरताच हा उपक्रम मर्यादित न ठेवता दररोज पाणी ठेवण्याचा प्रयत्न करावा. पक्ष्यांना पाणी मिळाले नाही तर सध्या दिसणारे काही पक्षी पुढील काळात नामशेष होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने