इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणे काळाची गरज - प्रा. डॉ. विजय शिरसाठ
भडगाव,दि.१६(प्रतिनिधी) - "इंग्रजी भाषा ही सर्व क्षेत्रात वापरली जात असुन तीचा वापर दिवसागणिक वाढत आहे. आजकाल भारतासारख्या देशामधील प्राथमिक शिक्षण देखील इंग्रजी च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दिले जात आहे. परंतु या भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी शब्द संग्रह व व्याकरणाचा योग्य वापर आवश्यक असून तिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी आज उपलब्ध आहेत", असे मार्गदर्शनपर विचार य ना. चव्हाण महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ विजय शिरसाठ यांनी मांडले ते वर्कशॉप आॅन स्पोकन इंग्लिश या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कला व वाणिज्य विभागाचे समन्वयक प्रा.डॉ संजय भैसे होते
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ कवि रविंद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख प्रा शिवाजी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन ईतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ चित्रा पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा डॉ सी एस पाटील, प्रा. बि.एस. भालेराव, प्रा एस ए कोळी, प्रा. जनार्दन देवरे प्रा ज्योति एस नन्नवरे, प्रा. वाघ सर प्रा जाधव प्रा. देसले, संदीप केदार अजय देशमुख दिलीप तडवी तुळशीराम महाजन प्रविण तडवी तसेच सर्व कला व वाणिज्य विभागाचे विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते