आदिवासी पारधी क्रांती संघटनेची घोषणा व लोगो के अनावरण

 आदिवासी पारधी क्रांती संघटनेची घोषणा व लोगो के अनावरण


       जळगाव दि.१६(प्रतिनिधी) आज दिनांक 16 /4/ 2023 रविवार रोजी अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी , जळगाव येथे आदिवासी पारधी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे घोषणा पत्र  व लोगोचे अनावरण संस्थापक अध्यक्ष मुकेश भाऊ साळुंखे यांनी केले व यात राज्य कार्यकारणी जिल्हा कार्यकारणी जाहीर करून त्यांना  नियुक्तीपत्र संस्थापक अध्यक्ष मुकेश भाऊ साळुंके यांचे शुभहस्ते देण्यात आले या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून 500 ते 600 पारधी समाज बांधव उपस्थित होते .

         अध्यक्षीय भाषणात- प्राण जाईल पण वचन जाणार नाही हा श्वास फक्त समाजसेवेसाठी राहील. एक रुपयाही पण खाल्ला जाणार नाही . मजबूत नाहीतर संघटना ही उच्च पातळीपर्यंत पोहोचवण्याचे काम मी करेल.

         या कार्यक्रमात महासचिव दिपक खांदे, राज्य उपाध्यक्ष भगवानसिंग साळुंखे, उपाध्यक्ष सुनिल दाभाडे ,राज्यसचिव अमोल , राज्य सचिव महेंद्र चव्हाण ,मुख्य संघटक बन्सीलाल , राज्य संघटक सचिन साळुंखे , विभाग अध्यक्ष विनोद , या सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच 30 जिल्ह्य अध्यक्षांची ही निवड ही याचवेळी करण्यात आली.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र चव्हाण यांनी केले व आभार प्रदर्शन सुनिल दाभाडे यांनी केले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने