हातेड खुर्द विकास सोसायटी चेअरमनपदी रमेश पाटील तर व्हाय.चेअरमपदी प्रितेश बाविस्कर बिनविरोध
चोपडा दि.१६( प्रतिनिधी) तालुक्यातील लहान हातेड येथे दि.14 एप्रिल 2023 शुक्रवारी रोजी सकाळी विकास सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळातून .श्री रमेश विठ्ठल पाटील यांची चेअरमन,तसेच श्री प्रितेश एकनाथ बाविस्कर यांची व्हाईस चेअरमन पदांवर बिनविरोध निवड करण्यात आली.
परिवर्तन पॕनलच्या सर्व विजयी संचालक मंडळाच्या वतीने,एक वर्षाच्या कालावधीसाठीं बिनविरोध निवड करण्यात आली आहे,तसेंच तज्ञ संचालक पदांवर, श्री चतुर नाना सूर्यवंशी व श्री देवेंद्र बापू कलाल यांची तर परिवर्तन प्ॅ नल प्रमुख मार्गदर्शक, श्री राहुलदादा सोनवणे यांच्या प्रयत्नातून बिनविरोध निवड करण्यात आली .
सदर चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडणूक साठीं, निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे श्री देसले यांनी कामकाज पाहिले यावेळी माजी जेष्ठ संचालकश्री रमेश नाना सोनवणे,श्री रघुनाना बाविस्कर,श्री अमृत आबा बाविस्कर, श्री सुनील नाना बाविस्कर, श्री बाळू आबा पावनकर, श्री भूषण दादा बाविस्कर,तसेंच माजी संचालक मंडळ सदस्य यांचाही निरोप समारंभ संपन्न झाला
संस्थेच्या सचिवांनी, श्री सुभाष सोनवणे यांनी तसेंच कर्मचारी वर्ग श्री अण्णा देशमुख, श्री कमलाकर सोनवणे यांनी संपूर्ण निवड प्रक्रिया सुयोग्य प्रकारे पुर्णत्वास नेन्यासाठी परिश्रम घेतले.