चोपडा ग.स.संस्थेत डॉ.बाबासाहेब यांची जयंती साजरी..
चोपडा दि.१६(प्रतिनिधी) :- येथील ग.स.शाखेतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुभाष वारडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणुन संचालक मंगेश भोईटे, योगेश सनेर, विभा.अधिकारी नारायण शिरसाठ यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात सुभाष वारडे यांनी डॉ.बाबासाहेब यांच्या जिवनकार्या विषयी यथोचित माहिती दिली. प्रमुख अतिथी यांनीही समयोचित भाषणे केलीत.
याप्रसंगी शाखाधिकारी दिलीप सपकाळे, स्मिता मोरे, शिवाजी बाविस्कर, जगन्नाथ बाविस्कर, उपशाखाधिकारी मीना तडवी, शरद पाटील, अनिता पाटिल, किरण सोनवणे, तुषार सूर्यवंशी, रोखपाल अनिल बाविस्कर, उज्वल शिंदे, जितेंद्र सुर्यवंशी, ललितकुमार पाटिल, योगेश बाविस्कर, लिपीक स्वप्निल सोनवणे, सुरेश पाटिल, दिपक खैरनार, योगेश पवार यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन शाखाधिकारी जगन्नाथ बाविस्कर यांनी तर आभारप्रदर्शन रोखपाल उज्वल शिंदे यांनी केले.