हातेड खुर्द विकास सोसायटी निवडणुकीत राहुल सोनवणे पॅनलचा झेंडा..

 हातेड खुर्द विकास सोसायटी निवडणुकीत  राहुल सोनवणे पॅनलचा झेंडा..

चोपडा दि. २ एप्रिल (प्रतिनिधी) तालुक्यातील हातेड खू विविध कार्यकारी सहकारी सोसायटी  निवडूकीत उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री राहुल रमेश सोनवणे यांच्या परिवर्तन पॅनलने १२च्या १२जागावर विजय मिळवत  शेतकरी पॅनलचे १२ वाजवत चारी मुंड्या चीत केले आहे.

सामाजिक कार्यकर्ते श्री राहुल रमेश सोनवणे यांनी प्रस्थापित शेतकरी पँनल च्या समोर परिवर्तन पॅनल नावाने तगडा पर्याय मतदारांना समोर उभा केला होता. विना सहकार नाही उध्दार या वृत्ती प्रमाणे सहकार क्षेत्रातील या पंचवार्षिक निवडणुकीत पूर्ण ताकतीने निवडणूक लढवून रिंगणात उतरवलेल्या १२ पैकी १२ जागांवर प्रचंड बहुमताने विजय मिळवला. अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणूकीत श्री राहुल सोनवणे यांच्यावर सभासदांनी टाकलेला विश्वास पँनल सार्थ ठरवतील असा विश्वास गावात व्यक्ती होत आहे

विमुक्त जाती /भटक्या जमाती वी.भा.प्र.मतदार संघ

विजयी उमेदवार 

१) कोळी अशोक    पौलाद (२०५)

अनुसूचित जाती विजयी उमेदवार 

१)शिरसाठ रामरतन भीमराव(१७४)

महिला राखीव विजयी उमेदवार

१)पाटील वत्सलाबाई बबनराव (२२५)

२)बाविस्कर वंदना शरद (२३०)

सर्वसाधारण मतदार संघ

विजयी उमेदवार

१)गुजराथी शैलेश चंदुलाल (१६४)

२)पाटील कपिल रमेश (१६८) 

३) पाटील किशोर आत्माराम (१९०)

४) पाटील कैलास त्र्यंबक (१७१)

५) पाटील रमेश विठ्ठल (१५४) 

६) पाटील शिवाजी देविदास (१७९) 

७) बाविस्कर प्रीतेश एकनाथ (१८६) 

८) सोनवणे अनिल अमृतराव (१६२) 

४) पाटील विश्वास सीताराम (८०) 

५) बाविस्कर निलेश मच्छिंद्र 

(११०)

६) वाणी चींधू नारायण (७७) 

७) सोनवणे विजय हिंमतराव (७०) 

उमेदवार विजयी  होण्यासाठी हातेड खुर्द गावातील युवक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने