डॉ.भिकन शिरसाठ यांना पीएच.डी.पदवी प्राप्त
पदवीधर शिक्षक श्री भिकन गोकुळ शिरसाठ यांनी मानव्य विज्ञान विद्याशाखेंतर्गत इतिहास या विषयातून *खानदेशातील टोकरेकोळी जमातीचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिचा चिकित्सक अभ्यास (1900-2018)* या शीर्षकाचा शोधप्रबंध विद्यापीठास सादर केला होता. त्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून *डाॅ.प्रा.धनंजय आर.चौधरी, इतिहास विभाग प्रमुख* ,प्रताप महाविद्यालय अमळनेर (स्वायत्य) यांनी मार्गदर्शन केले.
तसेच या अभ्यासासाठी साठी खा.शि.मंडळाचे चेअरमन व सर्व संचालक मंडळ, मा. प्राचार्य, सर्व संशोधन सल्लागार समिती सदस्य, अधिष्ठाता यांनी अनमोल सहकार्य केले. विद्यापीठाचे मा.कुलगुरु, प्रभारी प्र.कुलगुरु, कुलसचिव, उपकुलसचिव, संशोधन व विविध विभाग, इत्यादींनी प्रशासकीय सहाय्य केले. वरील सर्व मान्यवर तसेच शिक्षण विभागातील अधिकारी , पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विविध शैक्षणिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, संशोधक विद्यार्थी व मित्र परिवार यांनी डॉ. भिकन शिरसाठ यांचे पीएच. डी पदवी प्राप्त केल्या बद्दल अभिनंदन केले.