शिवपुराण कथा वाचक पंडित मिश्रा अक्षय तृतीयाला नंदुरबारात..
छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे करणार उद्घाटन.. माजीआमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निमंत्रण
नंदुरबार दि.०१(प्रतिनिधी): माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी व उद्योजक मनोज रघुवंशी यांनी आज सिहोर येथील शिव महापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांची भेट घेतली. पंडित मिश्रा यांच्या हस्ते दि. २२ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
उद्घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व उद्योजक मनोज रघुवंशी यांनी आज सिहोर येथे श्री विठ्ठलेश सेवा समितीचे शिव महापुराण कथाकार पं. पंडित मिश्रा यांची भेट घेतली. उद्घाटनाचे निमंत्रण पंडित मिश्रा यांनी स्वीकारले. यावेळी पंडित मिश्रा यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, उद्योजक मनोज रघुवंशी, योगी रघुवंशी, माजी नगरसेवक दीपक दिघे आदीसह भेट घेत यावेळी गमछा देऊन सत्कार केला.