चोपड्यात आ.सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या शिवसेना अन् भाजपा पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलला सर्वाधिक ९ जागांवर विजय .. बळीराजाला ५ तर सहकार पॅनलला अवघ्या ४ जागा
चोपडा दि.२९(प्रतिनिधी)* अत्यंत चुरशीच्या झालेल्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माजी आमदार प्रा.चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे , आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या शिवसेना व भाजपा गटाचे संयुक्तरित्या तयार झालेल्या शेतकरी विकास पॅनलने सर्वाधिक जागांवर ताबा मिळवत उसंडी मारली असून ९जांगावर विजयी पताका फडकविली आहे तर घन:शाम अण्णा पाटील व घन:शामभाई अग्रवाल यांच्या बळीराजा पॅनलने पाच जागा पटकावित द्वितीय क्रमांकाने आघाडी घेतली आहे.माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी व माजीआ.कैलासबापू पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी व भाजपा पुरस्कृत सहकार पॅनलला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे.एकंदरीत कधी नव्हे एव्हढ्या चुरशीत झालेल्या या निवडणुकीत पक्षा पक्षातील फाटाफुटीत तयार झालेल्या तीन पॅनलने तालुकाभर निवडणूक आखाडा भर उन्हात कडक झाला होता.चटके कुणाला बसतील याचा अंदाज काढण्यात राजकीय अभ्यासकांचा अभ्यासही कुचकामी ठरला होता . मात्र आजच्या निकालाने बाजार समितीत नवीन उलथापालथ होण्यास प्रारंभ झाला असल्याचे बोलले जात आहे.सत्ता स्थापनेसाठी जटील समस्या निर्माण होऊ पाहत असल्याने आगे आगे होता है क्या? तूर्त तरी एव्हढ्यावर थांबावे लागणार आहे.
विजयी उमेदवार पॅनलनिहाय पुढीलप्रमाणे शेतकरी विकास पॅनल विजयी उमेदवार व मते -
१) गोपाल श्रीराम पाटील (३६०)
२) वसंत पिरान पाटील (३१५)
३) शिवराज पाटील (३४८)
४) किरण रामलाल देवराज (३२१)
५) सनेर मनोज रामराव (२९६)
६) कल्पना भरत पाटील (२५२)
७) नरेंद्र वसंत पाटील(२५४)
८)विजय शालिकराव पाटील(२६१)
९)मिलिंद गणपतराव पाटील(२४६)
बळीराजा पॅनल विजयी उमेदवार मते -
१) नंदकिशोर चिंधू सांगोरे (२८१)
२) सोनाली नारायण पाटील (२७३)
३)घनश्याम निंबाजी पाटील (३०५)
४)डॉ अनिल रामदास पाटील(२५७)
५) विनायक रामदास चव्हाण (२५५)
राष्ट्रवादी भाजपा चे सहकार पॅनल विजयी उमेदवार व मते -
१) सुनील तीलोकचंद जैन (१४१)
२) सुनील अग्रवाल (१४२)
३) नितीन शालिग्राम पाटील(८८)
३) नंदकिशोर भानुदास पाटील(२६१)
फेर मत मोजणी
तर माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व भारतीय जनता पक्ष यांच्या शेतकरी विकास पॅनलला एका जागेसाठी झुंज द्यावी लागणार आहे. शेतकरी विकास पॅनलच्या कल्पना भरत पाटील ह्या दोन मतांनी विजयी झाल्या नंतर बळीराजा पॅनलच्या उज्चलाबाई सुनील पाटील यांनी फेर तपासणी मागणी केली असता फेर तपासणीत तीन मत वाढल्या मुळे कल्पना भरत पाटील यांना 253 मते मिळाली असून त्यांना विजयी घोषित करण्यात आले. उज्वला बाई यांना 252 मते मिळाली होती.