प्रा. अमित पाटील यांना पी एच डी प्रदान

 प्रा. अमित पाटील यांना पी एच  डी प्रदान      

जळगाव...कुलगुरू एम एल माहेश्वरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारतांना डॉ प्रा अमित पाटील व मार्गदर्शक

गणपुर (ता चोपडा)ता 28: शिरपूर येथील आर. सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित आय. एम. आर. डी परिसंस्थेतील एम. सी. ए. शाखेतील प्रा. अमित प्रकाशराव पाटील यांना कवयीत्री बहिणाबाईं  चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे विज्ञान शाखा अंतर्गत संगणक शास्त्र विषयात डॉक्टरेट पदवी कुलगुरू एम एल माहेश्वरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.                       

   प्रा. अमित प्रकाशराव पाटील यांचा " निसंदिग्धक: वर्ड सेन्स डिसअँबिग्युएशन फ्रेमवर्क फॉर मराठी" हा संशोधनाचा विषय होता. यासाठी त्यांना मार्गदर्शक डॉ. हेमंत दरबारी (मिशन डायरेक्टर- राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन पुणे, माजी महासंचालक C-DAC पुणे) आणि  सहमार्गदर्शक प्रा. डॉ. राकेश रामटेके (स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स, कबचौउमवी, जळगाव) यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे माजी शिक्षणमंत्री आ.अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, संस्थेचे चेअरमन  राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील, परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील, एम.सी.ए. विभाग प्रमुख प्रा. मनोज बेहेरे, एमएमएस विभाग प्रमुख डॉ. मनोज पटेल, पदवी विभाग प्रमुख डॉ. तुषार पटेल यांनी कौतुक व अभिनंदन केले..........

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने