चोपड्यात दुकान.नं१६ वर आनंदाचा शिधा वाटपाने कार्ड धारकांत पसरला आनंद.. पत्रकार महेश शिरसाठ यांच्या हस्ते झाला प्रारंभ..!
*चोपडा दि.१६(प्रतिनिधी )* : येथे गुढीपाडवा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शासनाने उपलब्ध केलेला आनंदाचा शिधा कीट डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था अंतर्गत दुकान नं.१६ या रेशन दुकानावर सामाजिक कार्यकर्ते पत्रकार महेश शिरसाठ यांच्या शुभहस्ते हस्ते वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाकडून गोरगरिबांचा सण उत्साहात साजरा व्हावा या उदात्त हेतूने शासनाने शंभर रूपयात चार जीवनावश्यक वस्तुचा कीटचे नियोजन केलेले आहे त्यात कार्डधारकांना शंभर रुपयात १ किलो रवा, १ किलो साखर, १ किलो पामतेल व १ किलो चनाडाळ वितरीत करण्याचे नियोजन केलेआहे त्याअनुषंगाने रेशनकार्ड धारकांना चार जिन्नस वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आला
यावेळी सुनील रमेश महाजन
शे. याकुब शे. रऊफ, कुमसिंग जामसिंग बारेला,मुरलीधर पाटील , गंगाराम चित्रकथी
हदिसुन्नता हो. युस खाटीक,
कुरेसी रसुक्खा हसलखा,
अल्लामोद्दीन रुकसानाबी,
शेख जब्बार से. सत्तार,
लोटन पाटील, फारूख महेबुब तेली,शे.रहेमान शे० नूर,
शे. छब्बीर शे हसन, हमीदखा उस्मानखा मनियार आदि उपस्थित होते.