चोपडा मतदार संघात विकास कामे सुपरफास्ट.. गावा गावात झळकतायं बोर्ड..आमदार सौ.लताताई सोनवणेंना नाही तोड..!रामनवमीला अनवर्दे खुर्द गावी ४३.७६ लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन
चोपडा दि.३१(प्रतिनिधी): तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथे मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र नवमीच्या शुभ मुहूर्तावर देव दर्शन घेत विकास कामांनी झपाटलेल्या आमदार दाम्पत्यांचे शुभ हस्ते ४३ लाख ७६ हजार रुपयांच्या निधीच्या समाजोपयोगी कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला तसेच सभा मंडप लोकार्पण होऊन "जय श्रीराम "व अण्णासाहेब हम तुम्हारे साथ है च्या जय घोषात परिसर दुमदुमला.
चोपडा तालुक्यातील जनतेच्या डोळ्यांचे पारणे फेडणारेआमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व कार्य सम्राट माजी आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे यांच्या हातात आमदारकीचा जनहित विकासाचा रेल्वे रथ हाती आल्या पासून विदाऊट ब्रेक अविरतपणे सुपर फास्ट सुरू आहे. आमदारकीचे स्टेरिंग हातात येताच विधानभवनाला वारंवार प्रदक्षिणा घालत जनता जनार्दनाची कामे मार्गी लावण्यासाठी उभयतांनी जीवाचे रान करत रंजल्या गांजलेल्यांना विकासाचा हात दिला आहे.रस्ते, पाणी,वीज या मुलभूत गरजांना प्राधान्य देत झपाट्याने आदिवासी मतदार संघाचा कायापालट केला आहे. याआधी महाराष्ट्र शासनाने या मतदारसंघाला विविध नामांकित पदे देऊनही विकास भोपळाच होता.मात्र खुंटलेल्या विकासाला तुफान वेगाने नेण्यात आमदार सोनवणे दाम्पत्य वरचष्मा ठरले आहेत.मतदार संघातील हर एक गावात विकासाची लोण पसरले असल्याने गावकरी जाम खुश झाला आहे.
काल दि.३०रोजी अनवर्दे खुर्द गावी स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी १० लक्ष रुपये,तर पाणी पुरवठा योजनेसाठी ३३.७६लक्ष रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते व माजी आमदार प्रा.चद्रकांत अण्णासाहेब सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडला.याप्रसंगी आदिवासी सेवक संजीव शिरसाठ, विकास सोसायटी माजी चेअरमन भालेराव चिमण बोरसे, विकासो.चेअरमन विजय अमृतराव बोरसे, चोसाका माजी संचालक साहेबराव बुटा शिरसाठ, पत्रकार महेश पांडुरंग शिरसाठ, सरपंच सौ. प्रतिभा गजानन शिरसाठ,सौ.मंगलाताई पाटील,नथ्थू गुरूजी, धनंजय साळूंके, श्रीराम विठ्ठल बोरसे, लक्ष्मण शिरसाठ,रमण ढोमण रायसिंग, वासुदेव बुधा शिरसाठ, बळवंतराव बोरसे, दिलीप शिवराम बोरसे, सतिष बाबुराव बोरसे, जगदिश दादाजी बोरसे, गजानन बोरसे, गजानन पूंजू शिरसाठ,माजी ग्रा.पं.सदस्य लवा भील ,प्रवीण हिंमत शिरसाठ,नंदलाल शिरसाठ, संजय छबिलदास शिरसाठ, कैलास पांडुरंग शिरसाठ , गजानन रायसिंग,विजय बोरसे, अण्णा पारे, ताराचंद पावरा,गणदास बारेला ,यासू बारेला , प्रवीण भील,लिलाधर शिरसाठ, चंद्रकांत भगिरथ शिरसाठ, सुनील शिरसाठ आदी उपस्थित होते. यावेळी रामनवमी निमित्ताने महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले होते.