लासुर विद्यालयाची कु.पायल विसावे तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत माध्यमिक गटात प्रथम

 


लासुर विद्यालयाची  कु.पायल विसावे तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत माध्यमिक गटात प्रथम

चोपडा दि.३१(प्रतिनिधी):   तालुक्यातील लासुर येथील महात्मा गांधी माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात  इयत्ता 10 वीत शिकत असलेल्या कु.पायल संजय  विसावे या विद्यार्थिनीने छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा  प्रसार व्हावा म्हणून आयोजित केलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मिळवला. 

तिच्या या यशाबद्दल  कु.पायलचे , तिच्या पालकांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, लो. ऑडिटर व सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे म.मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधू-भगिनी यांच्याकडून  हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने