भडगावात माउलीच्या शिबिरात 135 रक्तदात्यांनी केले रक्तदान...

 भडगावात माउलीच्या शिबिरात 135 रक्तदात्यांनी केले रक्तदान...


भडगाव दि.३१(प्रतिनिधी )येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या माउली फाउंडेशन तर्फे सलग सहाव्या वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 135 दात्यांनी रक्तदान केले. इंडियन रेड क्रॉस सोसायटी च्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

        शिबिराचे उद्घाटन माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष प्रसन्न कुमार रेदासानी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले याप्रसंगी त्यांनी आपल्या मनोगतातून रक्तदानाच्या चळवळीत सहभागी झालेल्या माउली फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला तसेच फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी, युवराज सूर्यवंशी, संगीता जाधव , जाकिर कुरेशी यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. शिबिर यशस्वी व्हावे, यासाठी सर्व कार्यकर्ते पंधरा दिवस आधीपासून परिश्रम घेत होते. त्या कार्यकर्त्यांचाही सन्मानपत्र देऊन सत्कार केला. कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वीतेसाठी ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेऊन रक्तदात्यांच्या गृहभेटी घेऊन त्यांना प्रेरित केले, रक्तदात्यांचे नोंदणी पत्र भरून घेतले. प्रत्यक्ष शिबिरात 135 रक्तदात्यांनी रक्तदान केले. अनेक रक्तदाते असे होते की, ज्यांनी पहिल्यांदाच रक्तदान केले. शिबिरातील वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी की, डॉ. ईश्वरसिंग परदेशी व त्यांच्या कुटुंबातील सहा व्यक्तींनी एकाच वेळी रक्तदान केले. तसेच प्लंबिंग असोसिएशनचे पदाधिकारी जुलाल महाजन,दिनेश मिस्त्री,अशोक महाजन, विवेक शिरसाठ, किरण नांद्रे यांनी देखील प्लंबिंग डेनिमित्त रक्तदान केले. रक्तदान शिबिरासाठी माउली फाउंडेशनच्या सर्व स्त्री पुरुष कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने