धरणगावी श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा
धरणगाव,दि.३१ (प्रतिनिधी) येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रदि.प्र.धरणगाव येथे परमपूज्य गुरु माऊली आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाने दिनांक 30. 3.2023 गुरुवार रोजी श्रीराम नवमीनिमित्त केंद्रात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली तसेच पाळणा सजवण्यात आला व भगवान श्रीराम यांची प्रतिमा ठेवण्यात आली व पूजा करण्यात आली तसेच सकाळी 10.30 वाजता स्वामींची आरती करण्यात आली. तसेच सामुदायिक श्री दुर्गा सप्तशती पाठ करण्यात आला व श्री प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनाआदर्शावर मार्गदर्शन करण्यात आले व सामुदायिक श्री रामरक्षा स्तोत्र वाचन करण्यात आले तसेच श्री राम जय राम जय जय राम असे सामुदायिक नामस्मरण करण्यात आले तसेच गुरूमाऊलीच्या मार्गदर्शनाने प्रति दर महिन्याच्या शुक्ल एकादशीला सकाळी 8.30 वाजता भूपाळी आरती नंतर ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत अखंड दिवस भर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरण करुन विनावादन होणार आहे असे मार्गदर्शन करण्यात आले दुपारी ठीक 12.40 वाजता भगवान श्रीरामांची आरती करण्यात आली व प्रसाद वाटप करण्यात आला.शेकडो भाविकांनी आरतीच्या व श्री राम नवमीच्या जन्मोत्सव सेवेच्या लाभ घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सर्वच सेवेकर्यांनी सहकार्य केले.