चोपडा आगारातुन नांदुरीगड यात्रोत्सवासाठी जादा बसेस
चोपडा दि.३१ ( प्रतिनिधी) - नांदुरीगड येथे सप्तश्रृंगी मातेच्या यात्रोत्सवा साठी गडावर जाणार्या भाविकांसाठी राज्य परीवहन महामंडळाच्या चोपडा आगारातर्फे दिनांक ३१ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान जादा बसेस सोडण्यात येणार आहेत .तसेच ज्या गावातुन थेट गडावर जाणारे ४४ प्रवाशी असतील त्या गावातून थेट जादा बस उपलब्ध करुन देण्यात येईल.चोपडा ते नांदुरीगड प्रौढ भाडे ३२५ रु. व हाफ भाडे १६० रु. (जेष्ठ नागरिक व महिला प्रवाशी) एवढे असुन चोपडा आगारातर्फे सोडण्यात येणार्या जादा बसेसचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी केले आहे.