आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या हस्ते अस्वलाच्या हल्ल्यात गतप्राण आदिवासी व्यक्तीच्या वारसास २० लाखाची शासकीय मदत प्रदान.. आदिवासी सेवक संजीव शिरसाठ यांच्या पाठपुराव्याची कार्य तत्पर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली अति शीघ्र दखल

 आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या हस्ते अस्वलाच्या हल्ल्यात गतप्राण आदिवासी व्यक्तीच्या वारसास २० लाखाची शासकीय मदत प्रदान.. आदिवासी सेवक संजीव शिरसाठ यांच्या पाठपुराव्याची कार्य तत्पर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली अति शीघ्र दखल

चोपडा दि.३१(प्रतिनिधी): अस्वलाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या इसमाच्या वारसास धडाकेबाज आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे , कार्य तत्पर प्रशासकीय अधिकारी व आदिवासी सेवक संजीव शिरसाठ यांच्या प्रयत्नांच्या त्रयोगी संयोगाने अति शीघ्र वीस लाख रुपयांची मदत प्रदान करण्यात आली आहे.आधार हरपलेल्या कुटूंबियांना वेळीच मदत मिळाल्याने आदिवासी समाजात हास्याची लहर पसरली आहे.

शेवरे बु येथिल बिसना बारेला हा व्यक्ती अस्वलाच्या हल्यात ठार झाला होता. त्याची पत्नी गं भा.बायसाबाई बिसना बारेला यांना आमदार सौ लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे   यांचे हस्ते शासकीय विश्रामगृह येथे १० लक्ष रुपयाचा चेक व १० लक्ष रुपयांची एफ डी अशी   एकुण २० लक्ष रुपयांची शासकीय मदत प्रदान करण्यात आली... त्यावेळी जाहिर शेख उपवनसंरक्षक, तहसीलदार अनिल गावित, हरपे साहेब साह्यक वनसंरक्षक चोपडा,अडावद वनक्षेत्रपाल आनंदा पाटील, यांनी प्रकरणाची तात्काळ दखल घेतली यावेळी अनिल गावीत तहसिलदार,आनंदा पाटील वनक्षेत्रपाल,गटविकास अधिकारी भरत कोसोदे,आदिवासी समाज सेवक संजीव शिरसाठ , भुषण पाटील सरपंच वरगव्हाण,सौ नायजाबाई पावरा,सौ समराबाई पावरा, सौ नर्साबाई पावरा सौ नानीबाई पावरा, ताराचंद पाडवी,खमुसिंग बारेला, नामदेव पाटील,येसु बारेला, उपस्थित होते.

या कामासाठी आदिवासी समाज सेवक संजीव शिरसाठ, यांनी वनविभागाला कागद पत्रांचा पाठपुरावा केला.जमिर शेख उपवनसंरक्षक,तहसिलदार अनिल गावीत,साह्यक वनसंरक्षक प्रथमेश हरपे , आनंदा पाटील वनक्षेत्रपाल अडावद यांनी तात्काळ दखल घेवुन अनमोल सहकार्य करत करुन एका गरीब आदिवासी महिलेला न्याय मिळवून दिल्या बद्दल आदिवासी समाजातून आभार व्यक्त करण्यात आले.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने