पाचोरा वृदांवन हॉस्पिटलमध्ये "कक्षाला संत शिरोमणी रविदास महाराज यांचे नामकरण
*पाचोरा दि.१२(प्रतिनिधी): येथील वृदांवन हॉस्पिटलमधील मल्टिस्पेशालीटी सेंटर "कक्ष नामकरण सोहळा संपन्न झाला असून च्या दुस-या मजला च्या कक्षाला "संत शिरोमणी रविदास महाराज"* असे नामकरण करण्यात आले आहे.या वेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की ,आपल्या समाजाचे डॉक्टर आपल्या रुग्णालयात साधा फोटो ही लावत नाही मात्र वृंदावन हाॅस्पीटल चे संचालक मराठा सामाजाच्या डॉक्टर साहेबांनी आपल्या हॉस्पिटला दुसऱ्या मजल्याच्या कक्षाला संत शिरोमणी रविदास महाराज असे नामकरण केले त्यामुळे रुग्णालयाचे संचालक डॉ, श्री.नीळकंठ पाटील यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमास भानुदास विसावे(राष्ट्रीय कर्याअध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ), डॉ निळकंठ पाटील संचालक वृदांवन हॉस्पिटल पाचोरा, मनिषजी काबरा (जिल्हा अध्यक्ष जनकल्याण समिति राष्ट्रीय स्वंयसेवक संघ) , पांडुरंग बाविस्कर राज्य उप प्रदेशाध्यक्ष , उत्तम दौलत मोरे,जिल्हाध्यक्ष,रविंद्र बाबुलाल अहिरे,तालुका अध्यक्ष भडगाव, देवचंद जाधव गोवर्धन ता अध्यक्ष पाचोरा, सुधिर बापु अहिरे युवा ता अध्यक्ष भडगाव. तसेच सर्व समाज बाधव मोठ्या संख्येने उपस्थित होते