सत्रासेन भागात असंख्य कार्यकर्त्यांचा सेनेत प्रवेश.. आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वावर विश्वास
चोपडा दि.१२(प्रतिनिधी): तालुक्यातील सत्रासेन येथे कार्यसम्राट आमदार सौ लताताई सोनवणे व माजी कार्यसम्राट आमदार आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रचंड संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शिवाय यावेळी ४ कोटी रुपयाचे कामांचा भुमिपुजन सोहळा आमदारांचे शुभ हस्ते पार पडला.
सत्रासेन येथील युवा नेता लिलाधर ठाकुर यांच्या सह महाराणा मित्र मंडळ, ठाकुर समाज मित्र मंडळ, जोशी समाज मित्र मंडळ ,भिल्ल समाज मित्र मंडळाचे कार्यकर्त्यांसह गांवातील अंसख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.आदिवासी भागातील विकास पाहून आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत झुंड च्या झुंड प्रचंड संख्येने कार्यकर्ते सेनेत प्रवेश करतील अशी ग्वाहीही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.