साद-प्रतिसाद वार्षिक चित्रगंध कला प्रदर्शन व गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सोहळा 2023 संपन्न

 साद-प्रतिसाद वार्षिक चित्रगंध कला प्रदर्शन व गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सोहळा 2023 संपन्न

__________________________


 चोपडा दि.१२(प्रतिनिधी):- येथे भगिनी मंडळ चोपड़ा संचालित ललित कला केंद्र चोपडा या कला महाविद्यालयाचे 'सादप्रतिसाद' वार्षिक स्नेहसम्मेलन अंतर्गत चित्रगंध वार्षिक कला प्रदर्शन उद्‌घाटन सोहळा व तालुक्यातील कलाक्षेत्रात प्रविण्य मिळविलेल्या विद्यार्थी व कलाशिक्षकांचा गुण गौरव, सत्कार सोहळा पार पडला. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षपद डाॅ. प्रा.श्री. आशिषभाई गुजराथी यांनी सांभाळले, तर चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन श्री. प्रल्हाद दगडू सोनार मुख्याध्यापक म. ज्योतिबा फुले हायस्कूल, शिरपूर यांचे शुभहस्ते झाले.  स्व.डॉ. सुशिलाबेन शहा यांच्या प्रतिमेस माल्यार्पन व पुजन केले. दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन केले. केले. मान्यवरांच्या स्वागत सोहळ्यानंतर वर्षभरात राज्यस्तरीय कला उपक्रमात विशेष प्राविण्य प्राप्त कलाशिक्षकांचा भेटवस्तू देवून गुणगौरव करण्यात आला त्यात विवेकानंद विद्यालयाचे कला- शिक्षक, श्री. राकेश विसपुते, सी.व्ही.निकुंभ हायस्कूल, घोडगांवचे कलाशिक्षक रतिलाल सोनवणे, चावरा इंग्लिश मिडीयम स्कूल च्या कलाशिक्षिका नुसरतजहाँ रियाजउद्दीन, इशरतजहाँ रियाजउद्दीन, बालमोहन विद्यालयाचे कलाशिक्षक किशोर कुवर, प्रताप विद्या मंदीर येथील दोन कला शिक्षक श्री.पंकज नागपुरे सर व श्री कमलेश गायकवाड यांना  मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तु देवून सन्मान करण्यात आला. 

या नंतर चोपडा तालुक्यातील शाळा,महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी सोबतच, खुशी भगवान चौधरी, चहार्डी,कु आविका कमलेश गायकवाड,चोपडा या विद्यार्थ्यांच्याही सत्कार करण्यात आला.

*ललित कला केंद्रातील विद्यार्थीनी कु.कांचन कोळी (भुसावळ) ए.टी.डी.द्वितीय हिला राज्यकला प्रदर्शन पुणे यांचे गुणवत्ता प्राप्त व नाशिक कला निकेतन येथे अखिल भारतीय चित्रप्रदर्शनीत वेस्ट इंडीयन आर्ट पेन्टींग अवार्ड व ४०००/- रोख बक्षिस मिळाले.*

*कु.दिव्या सैतवाल (जामनेर) हिला डाॅ.भाऊसाहेब अॅकॅडमी,अमरावती आयोजीत राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमाक व रु.२०००/-, प्रमाणपत्र प्राप्त झाले* 

तसेच  *मयूर राजपूत (शिंदखेडा)  भाऊसाहेब  हिरे  राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक व ₹.२१०००/- चे रोख बक्षिस मिळाले.*


*वार्षिक चित्रप्रदर्शात* वर्गनिहाय बक्षिस वाटप कार्यक्रम पार पडला. 

त्यात फौंडेशन वर्ग -

 स्वरूप पाटील (चहार्डी) द्वितीय - प्राप्ती पाटील (कर्की), तृतीय- निखित ठाकरे (चोपडा) उत्तेजनार्थ- नम्रता सावकारे

 स्केचिंग- भूपेंद्र महाजन- (किनगाव)- 

एटीडी, प्रथम वर्ष वर्गातून

 प्रथम- तृप्ती शहा

व्दितीय - प्रमोद वारुळे

 तृतीय - केतन माळी 

उत्तेजनार्थ- मयुर राजपूत,प्रसाद सोनवणे , (चोपडा), 

एटीडी द्वितीय वर्ग- 

प्रथम - आकाश पावरा (खंबाळा), द्वितीय- शिवम सैंदाणे(जळगाव) तृतीय-आदिती जोशी  उत्तेजनार्थ- धनश्री पाटील,कोमल लोहार

 जी.डी.आर्ट वर्गातून 

प्रथम- अर्चना वसावे द्वितीय-पल्लवी माराठे (शिरपुर) तृतीय - विनल गुजर

स्केचिंग - अर्चना वसावे

तर उत्कृष्ट निसर्ग चित्र - प्रमोद वारुळे

 तसेच सर्व विभागातून सर्वोकृष्ट चित्र - नम्रता अग्रवाल (चोपडा) या सर्व विद्यार्थ्यांना बक्षिस वाटप मान्यवरांच्या हस्ते झाले.


कार्यक्रम प्रसंगी - प्रमुख पाहूणे म्हणून डाॅ.प्रा.आशिष गुजराथी- उपप्राचार्य,समाजकार्य महाविद्यालय, चोपडा, सौ.कल्पना पोतदार,  श्री.मगन बाविस्कर सर, श्री.मच्छिंद्र महाले सर, माजी प्राचार्य श्री.राजेंद्र महाजन,श्री.पंजाब बाविस्करव विविध विभागाचे विभाग प्रमुख तसेच कलाशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  विनल गुजर व स्नेहल पाटील तर आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी कांचन कोळी यांनी केले.

 कार्यक्रम व प्रदर्शन प्रमुख प्रा.विनोद पाटील होतेप्रदर्शनाचे प्रमुख आकर्षक सेल्फी पाॅईट होते.कार्यक्रमास प्राचार्य सुनिल बारी,लिपीक भगवान बारी, सेवक-अतुल अडावदकर, प्रविण मानकरी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने