“आंतरराष्ट्रीय महिला दिन” कार्यक्रमास खासदार श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थिती
चोपडा,दि.१२(प्रतिनिधी) येथील पंचायत समिती, चोपडा येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत “आंतरराष्ट्रीय महिला दिन”* निम्मित महिलांसाठी आयोजित कार्यक्रमास *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हूणन उपस्थित राहून उपस्थित महिला मंडळींना मार्गदर्शन करून संवाद साधला.
यावेळी जागतिक महिला दिनानिम्मित विविध प्रश्न सोडविणेसाठी सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणा, स्वंयसेवी संस्था यांचे मार्फत महिला बचत, महिला स्वंयसहयत्ता संस्थेच्या महिलांतर्फे बचत गट वस्तू विक्री स्टोल उभारण्यात आले, तसेच विविध शासकीय योजनांची प्रत्यक्ष लाभासाठी संबंधित विभागामार्फत माहिती देण्यात आली. यावेळी विविध बचत गटांना नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी *सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया* मार्फत एकूण रु.८.०० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येऊन *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्या हस्ते मंजुरी पत्र वाटप प्रदान करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष श्री.राकेश पाटील, तालुकाध्यक्ष श्री.पंकज पाटील, शहराध्यक्ष श्री.गजेंद्र जैस्वाल, जिल्हा चिटणीस सौ.रंजना नेवे, सौ.भरती क्षिरसागर, श्री.हिंमतराव पाटील, श्री.भरत सोनगिरे, श्री.विठ्ठल पाटील, श्री.दिपक पाटील, श्री.लक्ष्मण पाटील, श्री.मनोज सनेर, श्री.पंकज पाटील, श्री.विकास पाटील, श्री.अमित तडवी, श्री.मिलिंद वाणी, गटविकास अधिकारी सौ.निशा जाधव, श्री.प्रदिप बाविस्कर, श्री.संभाजी पाटील व तालुक्यातील महिला उपस्थित होत्या.