जनता हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नाटकातून दिला वैज्ञानिक संदेश

 जनता हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नाटकातून दिला वैज्ञानिक संदेश 



   शिंदखेडा,दि.१२(प्रतिनिधी) येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

 या कार्यक्रम प्रसंगी थोर भारतीय वैज्ञानिक, नोबल पारितोषिक विजेते डॉक्टर सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या श्रीमती एम डी बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक श्री. उमेश देसले, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस एस बैसाणे, श्रीमती एस एस पाटील, श्री बी जे पाटील, श्री डी एच सोनवणे, श्री आर पी वाघ, श्री एस के जाधव, श्री सी व्ही पाटील, श्री डी के सोनवणे आदी उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे औचित्य साधून इ.9वीच्या विद्यार्थिनी अंकिता माळी, श्रद्धा बेहरे, सारिका बेहेरे, भूमिका पिंपळे, गितेश्वरी पाटील, आरती पाटील, नयना भामरे या विद्यार्थिनींनी वैज्ञानिक गीते सादर केले. तसेच समाजातील अंधश्रद्धा दूर होण्यासाठी वैज्ञानिक नाटक सादर करून वैज्ञानिक संदेशही दिला. याप्रसंगी घेण्यात आलेल्या वैज्ञानिक रांगोळी स्पर्धेत विद्यार्थिनींनी मानवी अवयवांच्या आकृत्या रांगोळीने सुबकरित्या रेखाटल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान शिक्षक श्री ए टी पाटील तर मान्यवरांचे आभार श्री एस ए पाटील यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने