मनोकामना सिद्ध होणाऱ्या ॐ सिध्देश्वर महादेव मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा ..५१ जोडप्यांचा पंचकुंडी हवन.. प.पू.प्रसाद महाराज यांच्या शुभहस्ते कलशारोहण

 मनोकामना सिद्ध होणाऱ्या ॐ सिध्देश्वर महादेव मंदिराचा  भव्य  प्राणप्रतिष्ठा सोहळा ..५१ जोडप्यांचा पंचकुंडी हवन.. प.पू.प्रसाद महाराज यांच्या शुभहस्ते कलशारोहण

 चोपडा दि.०३( प्रतिनिधी महेश शिरसाठ)* :  शहरातील महावीर नगरातील जागृत देवस्थान  ॐ सिध्देश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा  दि. ५ मार्च ते ८ मार्च २०२३ पर्यंत कालावधीत  आयोजित करण्यात आला आहे . या चार दिवस चालणाऱ्या सोहळ्यात भव्य शोभायात्रा,त्रि मंडळ भजन संध्या,शिव संगीत,५१ जोडपी पंचकुंडी  महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे यात कलश व ध्वजारोहण अमळनेर येथील  सखाराम महाराज संस्थानचे गुरुवर्य प.पू.प्रसादजी महाराज यांच्या शुभहस्ते होणार असून ज्योतिष  प्राज्ञ आचार्य विवेक कुलकर्णी हे  विधीवत पूजा करणार आहेत.

महावीर नगर वासियांना मंदिर निर्माण होण्या अगोदरच भगवंत देवाधिदेव महादेवाने अनेक शिव भक्तांच्या ईच्छा पूर्तीचा अदृष्य साक्षात्कार घडविला आहे. प्रत्यक्ष आखोदेखी प्रचिती आल्याने ॐ सिध्देश्वर महादेव मंदिर स्थापित होत आहे.  

 कार्यक्रमा्ची रुपरेषा अशी : भव्य शोभायात्रा दि. ५/३/२०२३ रविवार रोजी सकाळी ९:०० वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मारोती मंदिपासून प्रारंभ.रात्री ८ ते ११ त्रि मंडल भजन होत असून सद्गुरु रामचंद्र भजनी मंडळ, चोपडा, श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ नागलवाडी, खाचनेकर भजनी मंडळांचा समावेश आहे.

प्राणप्रतिष्ठेच्या प्रथम दिवस,दि. ६/३/२०२३ सोमवार रोजी होम हवनात मंडळ देवता स्थापन, अभी स्थापन, नवग्रह हवन, मूर्ती जलाधिवास, धान्याधिवास, स्थापित देवता, सायं पूजन व आरती.दि. ७/३/२०२३ मंगळवार रोजी स्थापित देवता, प्रातः पूजन, स्थापित देवता हवन, मूर्ती पुष्पाधिवास, शयनाधिवास, देवता सायं. पूजन, दीपोत्सव व आरती,रात्री ८ ते ११वाजे दरम्यान धुळेनामांकित गॅलक्झी म्युझिकलचा शिव भजन संगीत कार्यक्रम होत आहे.तसेचदि. ८/३/२०२३, बुधवार रोजी स्थापित देवता, प्रातः पूजन, मुख्य हवन, ॐ सिध्देश्वर महादेव लिंग प्राणप्रतिष्ठा, कलशारोहन, पूर्णाहूती, आरती व तसेच महाप्रसाद भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

तरी  शिव भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ असे आवाहन मंदिर आयोजन समितीने केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने