मराठी भाषा दिनी हास्य काव्यरंग मैफल संपन्न..चोपडा मसाप - रोटरीचा संयुक्त उपक्रम

 मराठी भाषा दिनी हास्य काव्यरंग मैफल संपन्न..चोपडा मसाप - रोटरीचा संयुक्त उपक्रम


चोपडा दि.०२(प्रतिनिधी)- ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ मराठी साहित्यिक तात्यासाहेब वि. वा. शिरवाडकर 'कुसुमाग्रज' यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून चोपडा येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा व रोटरी क्लब, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने नगर वाचन मंदिराच्या अमरचंद सभागृहात हास्य काव्यरंग मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफिलीत मसाप शाखेच्या सदस्यांनी स्वरचित तसेच संकलित विनोदी कविता, चारोळ्या, विडंबन सादर करून उपस्थित श्रोत्यांना मनमुराद हसवत आनंदानुभूती दिली.

          या मैफलीत एस. एच. पाटील, प्रभाकर महाजन, एस. बी. पाटील, प्रा. निवृत्ती पाटील, संगीता बोरसे, योगिता पाटील, तुषार लोहार, राधेश्याम पाटील, डॉ. मधुकर भुसारे, संजय बारी, विलास पाटील, पंकज शिंदे, गौरव महाले यांनी स्वलिखित तसेच संकलित कविता, विडंबने सादर केली. उपस्थित श्रोत्यांनी या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली.

           प्रारंभी शहरातील ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. विकास हरताळकर, रोटरीचे सहप्रांतपाल नितीन अहिरराव, उद्योजक आशिष गुजराथी, मसाप कार्याध्यक्ष विलास पाटील, रोटरी क्लबचे मानद सचिव गौरव महाले, प्रकल्प प्रमुख अनिल अग्रवाल यांनी दीप प्रज्वलन करून कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन केले. हास्य काव्यरंग मैफलीचे प्रास्ताविक मसाप कार्याध्यक्ष विलास पं. पाटील यांनी, सूत्रसंचालन पंकज शिंदे व आभार प्रदर्शन गौरव महाले यांनी केले. या मैफिलीस शहरातील अनेक रसिक, रोटरी व मसाप सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने